वडाळी – पी.सी.पटेल
संपूर्ण शासकीय यंत्रणा आता ऑनलाइन झाली असल्याने सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी फिर फिर न करता आपल्या छोट्याशा गावातच महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्याला मिळु शकतील. कागदपत्र मिळण्यासाठीची सोय लहानश्या गावात उपलब्ध होणे ही गौरवाची बाब आहे.या पूर्वी कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते त्यात पैसा व वेळ जास्त लागत असे.आता या दोन्हींची बचत होऊन कमी वेळेत कामे होणार आहेत.गावातील लोकांसाठी सुविधा उपलब्ध झाल्याने तिचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अँड.सीमा वळवी यांनी केले. खैरवे भडगाव ता.शहादा येथे महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अँड.सीमा वळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजीत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ,जिल्हा परिषदेच्या सदस्या हेमलता शितोळे,पंचायत समितीच्या सदस्या भानुमती ईशी,चंदनबाई पानपाटील,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना मोहिते, सरपंच प्रवीण निकुंभे,उप सरपंच रमनबाई गिरासे,माजी लोकनियुक्त सरपंच डॉ.उमेश पाटील,ब्लू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजय पानपाटील,वडाळी चे माजी सरपंच दीपक पाटील, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी नितेश मोरे,महेश ठाकरे, आराळे उप सरपंच ईश्वर अखाडे, सारंगखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम कोळी,रवींद्र कुवर,महेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.
अॅड. सीमा वळवी पुढे म्हणाल्या महा-ई-सेवा च्या माध्यमातून तळागाळातील गरजू माणसाला न्याय मिळवून देता येईल.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भडगाव खैरवे सह इतर गावांना विशेष सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विविध योजना व कागदपत्रांचे महत्व यासंबंधिंधी माहिती दिली. माणसाची ओळख ही कागदपत्रांचे होते आपल्याकडे कागदपत्र पुर्ण राहि ल्याशिवाय प्रशासनाकडे कोणतेही काम होऊ शकत नाही ते मिळण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खैरवा भडगावसह परिसरातील समस्या सोडवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी गावांना संपर्कात राहून विकास कामांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महा-ई सेवा संचालक देवेंद्र पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महा-ई-सेवा चे संचालक कैलाश पानपाटील, ग्रामसेवक जी.डी. वाडीले, पोलीस पाटील धनराज पानपाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू पानपाटील, सेवानिवृत्त पोलीस पाटील भरत गिरासे, विजय गिरासे, दिलीप गिरासे, संजय पानपाटील,जतन पानपाटील, महारू भील, सुभाष पवार विजय सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.