नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथे गव्हाचे पीक आगीपासून वाचवण्यासाठी शेतकरी संजय एकनाथ चौधरी (वय 56 ) यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.याबाबत अधिक वृत्त असे की ,बामखेडा त.त.येथील मयत संजय एकनाथ चौधरी व त्यांचे मोठे बंधु रोहिदास एकनाथ चौधरी हे दोघे भाऊ त्यांच्या शेतात हजर असताना त्यांच्या शेतालगत असलेले देविदास उर्फ गणेश उखा पटेल यांचे शेत गट नं. 124 ज्यात उसाची लागवड केली होती, सदर शेतीच्या वरून विद्युत वाहिनी (इलेक्ट्रिक लाई) गेलेली असून त्याच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला अचानक आग लागली. बाजूला संजय चौधरी व रोहिदास चौधरी यांचा गव्हाची लागवड असलेले शेत गट नं. 129 मधील संजय एकनाथ चौधरी हे गहू पिकाला आग लागू नये म्हणून उसात लागलेली आग विझविण्याचा प्रयत्नात होते, परंतु सदर आगीने रौद्र रूप धारण केल्याने उसाच्या शेतात ते अडकून पडले त्यामुळे त्यांच्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावातील पोलीस पाटील डॉ योगेश चौधरी , सरपंच मनोज चौधरी व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीसांनी भेट देत घटनेची माहिती घेत पंचनामा केला.
संजय चौधरी हे पीक संरक्षण सोसायटी चे माजी चेयरमन होते त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.