प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – शहरातील डोंगरगाव रस्त्या वरुन गोणपाट घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळ अचानक आग लागल्याने सुमारे सहा लाखाचे बारदान जळाल्याचे समजते .
घटनास्थळी शहादा नगरपालिकेचा अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला .
शहरातील डोंगरगाव रस्त्यावरुन गोणपाट भरुन घेऊन जाणाऱ्या ( एम . पी . ० ९ एल . क्यू ०७८६ ) या ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेंट जवळ अचानक आग लागली . गोणपाट भरलेल्या ट्रकला अचानक आग लागलेली लक्षात येताच एकच धावपळ उडाली . गाडी नागेश्वर ट्रेडिंग कंपनीची असून बारदानाची किंमत सहा लाख रुपये असल्याचे कळते • ओम प्रकाश राजपुरी यांच्या मालकीच्या ट्रकला लागलेली आग लक्षात येताच घटनास्थळी शहादा पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करून आग विझविण्यात आली . तो पर्यंत रस्त्यावर ठीक ठिकाणी गोण पाट गाडीतून खाली पडून जळत होते काही काळ वाहतूकही बंद होती संबंधित ट्रकला शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला . घटनास्थळी शहादा पोलीस ठाण्याचा पथकाने वाहतूक सुरळीत केली .