नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सामोडे ग्रामपंचायत अंदाधुंद कारभार ,त्यामुळे “पाणी उशाला, कोरड घशाला” तरीही महिलांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

सामोडे ग्रामपंचायत अंदाधुंद कारभार ,त्यामुळे “पाणी उशाला, कोरड घशाला” तरीही महिलांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती
पिंपळनेर( प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील सामोडे येथील ग्रामपंचायत अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे न करता ,समानतेने न करता सापत्नभावाची वागणूक काही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना दिली जाते. सामोडे ग्रामपंचायत पासून पुढे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर घोडया माळ परिसर, यशोदा नगर, कन्हैयालाल नगर जेबापूर रोड, रामनगर सामोडे चौफूली येथील परिसरात पाणी पुरवठा योजनेतून केला जाणारा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने तर सोडा, पण सहा ते सात दिवसात एक तास पाणी सोडतात, तेही जमिनीवर एक फूट उंचीवर एक थेंबही पाणी पडत नाही. नळ आल्याचे कळत नाही. इलेक्ट्रीक मोटारीच्या साह्याने पाणीपुरवठा करून घ्यावा लागतो .अनियमितता तर आहेच ,शिवाय पाणी टाकीची क्षमता व प्रत्यक्षात करावा लागणारा पाणीपुरवठा याचा ताळमेळ नाही. रोज नवीन नवीन कनेक्शन दिले जातात. काहींना दिवसातून दोन वेळा, तीन वेळा, काहींना मात्र पाच दिवसात एक तास ,तो दिवस गेला ,तो तास गेला तर पुढचे पाच दिवस पुन्हा वाट पहावी लागते.10 दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. अशा पद्धतीने वर्षातून फक्त 70 दिवसात 70 तास पाणीपुरवठा आणि वर्षाची पाणीपट्टी, स्पेशल पाणीपट्टी म्हणून आकारणी करतात, वसूल करतात .आणि म्हणून तर सामोडे गावाच्या काही ठिकाणी दोन वेळा पाणी सोडताना टाकी ओव्हर फ्लो होऊन दिवसभर नळ चालू राहतात, कर्मचारी ते बंद करीत नाही, हजारो लिटर पाणी वाया जाते, लोक तक्रारी करतात. शिवाय या ग्रामपंचायत अंतर्गत सॅनिटरी चार्जेस वर्षाचे लावतात, पण एक दिवस मी घंटागाडी येत नाही. कचरा उचलत नाही .शिवाय दिवाबत्ती कर आकारतात काही ठिकाणी दिवसभर लाईट चालू असतात ,त्याकडे लक्ष देत नाही. काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य त्याकडे कोणी लक्ष देत नाही अशा परिस्थितीत हे कमी म्हणून काय अनेक ग्रामपंचायतीमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे दुकानाचे गाळे बांधले आहेत. त्यावर नियंत्रण नाही .शिवाय ग्रामपंचायतीचा कर्मचारी परस्पर शासकीय जमिनी एकाची दुसऱ्या नावे करून लाखो रुपये कमवतो.बनावट सही शिक्के तयार करून परस्पर विक्री करतो. तक्रार करूनही त्यावर कारवाई होताना दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही .कृपया तात्काळ जमिनीखालून अनेक नळ कनेक्शन, तर काहींना 24 तास काहींना तिसऱ्या मजल्या पर्यंत मोटर न लावता पाणी पोहोचते. . शिवाय सामोडे मुळ गावापासून पुढे पाच हजार लोकवस्ती आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र जामखेली धरणावरची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.विहीर खोदणे ,पाईप लाईन टाकणे, जलकुंभ (पाण्याची टाकी)बांधणे ,भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्या लक्षात घेऊन, दोन लाख क्षमतेचा जलकुंभ अपेक्षित आहे. योजना आखून, सर्वे करून मंजूर झालेले 6 कोटी रुपयातून पाणी पुरवठा योजना तात्काळ या कामाला गती द्यावी. जीवनावश्यक, जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी सामोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व ग्रामस्थ करीत आहेत. आज 44 अंश सेल्सिअस तापमान असताना महिला हंडे,गूंडे घेऊन दुपारी बारा वाजता ग्रामपंचायतीकडे निघाल्या, वास्तविक अवघ्या एक ते दीड लाख रुपयात पाचशे फुटाचा बोर व एक मोटार बसवली तरी होऊ काम होऊ शकत . किमान एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. सात दिवसात एक तास फक्त पाणी येते. वास्तविक धरणाच्या लागून नदी व त्या नदीवर बोर केल्यास पाणीपुरवठा होऊ शकतो. पण कोणताही लोकप्रतिनिधी या भागातील लक्ष देत नाही. कोण निवडून गेला त्याचे दर्शन होत नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान प्रशासक, ग्रामसेवक, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार दिवाबत्ती पाणीपुरवठा करून घेतला आहे .बाकीच्या जनतेशी त्यांना काही घेणे देणे नाही. निवडणुकीच्या वेळेस लोक पाया पडू देत नाही, तरी पाया पडतात. आणि एकदा निवडून गेले की कायमचे गायब होतात. आजही लोकांना आपला ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच, उपस रपंच ,पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कोण आहे ही माहित नाही. ते ढुंकूनही पाहत नाही. वास्तविक पाहता शंभर टक्के वसुली होत असताना, अनेक प्रकारची उत्पन्नाची साधने ग्रामपंचायतीकडे असताना पुन्हा कर्मचाऱ्यांना पगार नाही कर्मचाऱ्यांची पगारासाठी ओरड तर काही कर्मचारी वसुलीसाठी पण जात नाही अशाचा पगार मात्र वेळेवर होतो. इतका अंदाधुंद कारभार जिल्ह्यातल्या नव्हे राज्यातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीत नसेल कृपया प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नाही तर भविष्यात पाण्याअभावी एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? म्हणून तात्काळ पाणीपुरवठ्याची किमान एक दिवसाआड, एक तास पाणीपुरवठ्याची सोय करावी या मागणीसाठी, पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाऱ्या माता-भगिनी व ग्रामस्थ करीत आहेत्. . विद्यमान प्रशासक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, प. स. सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य. विद्यमान आमदार मा. मंजुळाताई गावित या सर्वांच्या नजरेस हा भीषण पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सद्यस्थितीत अवघ्या एक ते दीड लाखात पाचशे फूट बोर करून त्यात एक मोटर बसवून सुद्धा होऊ शकतो. अनेक लोकप्रतिनिधींनी शब्द दिला आहे .ग्रामपंचायतीकडे त्यांनी पाठपुरावा केल्यास योजना यशस्वी रित्या कार्यान्वित होऊ शकते. फक्त मानसिकता पाहिजे. व्हिडिओ,बीडीओ ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे अन्यथा भविष्यातील परिणामास त्यांनाही जबाबदार धरले जाईल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:26 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!