धुळे प्रतिनिधी: दि.11. रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धुळे – साक्री महामार्गावरील आनंदखेडे शिवारात तालुका पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांना एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलवर संशय आला त्यांनी त्या मोटरसायकलवरील दोघा कडे चौकशी केली असता ते गांजा तस्करी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मोटरसायकलसह गांजा जप्त करत दोघांना जमा केले धुळे – साक्री महामार्गावरील आनंदखेडे शिवारात हॉटेल गुरुनानक जवळून जाणाऱ्या विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल स्वारांनी पोलिसांना पाहताक्षणी मोटरसायकलचा वेग वाढवल्यामुळे पोलिसांना संशय आला . त्यामुळे पोलिसांनी ती मोटरसायकल अडवले असता त्या मोटरसायकलवर बसलेले दोघे गांजा वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. या दोघांकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत सुमारे पाच किलो 180 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. 25 हजार 900 रुपये किमतीचा हा गांजा जप्त करीत पोलिसांनी गांजा वाहतूक करणाऱ्या दीपक पावरा (२०) राहणार नंदननगर पाडा बोराडी तालुका शिरपूर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याचा साथीदार फरार झाला दिपकने पळून गेलेला साथीदार अजय पावरा रा. लाकडया हनुमान, शिरपूर हा असल्याचे सांगितले या दोघांविरुद्ध पो. कॉ. योगेश कोळी यांचे फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक सागर काळे पुढील तपास करीत आहेत.