प्रतिनिधी – एरंडोल येथील महसूल कर्मचाऱ्यांचा शासनाकडून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
एरंडोल येथील तहसील कार्यालय आवारात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर बसले आहेत.त्यांच्या शासन निर्णय 01 मे 2021 अन्वये राज्य स्तरीय केलेला नायब तहसिलदार संवर्ग रद्द करावा, नियमानुसार पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना वर्ग -3 महसूल सहाय्यक पदी पदोन्नती द्यावी,अव्वल कारकून मधून नायब तहसिलदार पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा पदोन्नती कोटा 25 % वरून 50 % करावा, महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत,तातडीने भरती प्रक्रीया राबवावी , कोतवांना यांना चतुर्थश्रेणी मध्ये पदोन्नती कोटा 40 % केला त्या प्रमाणे भरती प्रक्रीया करावी, नायब तहलिसदार ग्रेड पे 4300 / – वरून 4600 / – करावा, नवीन 27 तालुकेत महसूलेत्तर कामांकरीता पद निर्मिती करून पदे तात्काळ भरावीत, दांगट समितीचे अहवालानुसार आकृतीबंद लागू करावा , गृह विभागाचे धर्तीवर महसूल कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा, दांगट समितीचा अहवाल प्रसिध्द करून अंमलबजावणी करावी,राज्य स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृती स्पर्धा दरवर्षी नियतिपणे पार पाडाव्यांत, गौणखनिज विभागांत खनिकर्म निरीक्षक हे अ.का. दर्जाचे पद निर्माण करावे,संजय गांधी , निवडणूक , टो.ह.यो. पीएम किसान वगैरे महसूलेत्तर कामांसाठी स्वतंत्र पदे निर्माण करावीत, बऱ्याच कालावधीपासून अस्थायी असणारी पदे कायम करावीत, महसूल दिन दर वर्षी राज्य , विभाग व जिल्हा स्तरांवर साजरा करावा व त्याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा . शासनाने आमच्या न्यायिक मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, सुधारित निकषांनुसार पदोन्नतीची प्रक्रिया विहीत काल मर्यादित पूर्ण करावी अशा मागण्या आहेत.
सदर संपा मध्ये तहसील कार्यालय एरंडोल महसूल कर्मचारी तालुका अध्यक्ष किशोर उपाचर्या, उपविभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत,किशोर माळी, मंडळ अधिकारी मनोज शिंपी, मुकेश जाधव, कार्यकारणी सदस्य मधुकर नंदनवार, नंदकिशोर वाघ, ज्योती चौधरी, भालचंद्र गवळी, मनोहर राजींद्रे, महेंद्र सुतार, राजेंद्र वाघ, योगेश्री तोंडे, स्मिता महाजन, सविता बर्गे, शिवाजी महाजन, गोपाळ शिरसाट, शिपाई श्री दिलीप शिंदे, नितीन सैनदाने, रमेश परदेशी, आनंदा फुलपगार, महेश जोशी तसेच इतर सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत.