चोपडा दि.१८ (प्रतिनिधी) चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणी स्थळावर होलिका उत्सवाचे आयोजनानंतर रंगपंचमी धूळवळ मोठ्या आदर भावाने आरगॅनिक रंगाची उधळण करत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ढोलच्या निनादात जल्लोषात साजरी करण्यात आली.
सध्या टीव्हीवर सुरु असलेली मालिका” तारक मेहता का उलटा चष्मा”मधील गोकुलधाम सोसायटीतील रहिवाशांचा जिव्हाळा ,सलगीचा कॉलनी व सोसायटी परिसरात पडसाद उमटून जिव्हाळ्याचा मळा फुलण्यास वेग आल्याचे चित्र रेखाटले जात आहे .नुकताच रंगपंचमी निमित्त महावीर नगर, एस टी कॉलनी, बालाजी नगर रामनगर या भागातून यांचा प्रत्यय आला.
समाजा समाजामधील दरी दूर करून सलोखा निर्माण व्हावा यासाठी पत्रकार महेश शिरसाठ, बांधकाम ठेकेदार सोपान मराठे, संदीप सावळे सर, भारत राजपूत, रोहित सोनार, डॉ.रविद्र बडगुजर, आप्पा मासरे, भटूशेठ सोनार,शाम बडगुजर,रतिलाल बडगुजर, प्रफुल्ल पाटील,देवांग सर,सुरेश पाठकसर,गोपाल झिपरु मराठे, राजेंद्र बडगुजर, रामसिंग पाटील,देवरेसर, चेतन देवरे प्रमोद पाटील सर, किरण चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पियुष चौधरी, भावेश सोनवणे,प्रणव राजपूत, आकाश महाजन, स्वप्नील साळुंखे,दीपक तायडे,पंकज पाटील, सुमित सोनार , दिनेश मासरे, हरीओम बडगुजर,जयेश बडगुजर, सुनील सोनवणे,भैय्यू सावळे,किरण जाधव आदिंनी मेहनत घेतली. यावेळी वेळी महिला वर्गाने व बालक वर्गाने शिस्त बंध्द रंगाची उधळण करत संगीतमय वातावरणात गरबा नृत्यावर ठेका धरल्याने मनसोक्त आनंद लुटला.