(पाचोरा)भुवनेश दुसाने
दिनांक~०७/०४/२०२२
१) परिक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न देणे हे कितपत योग्य आहे ?
२) फी भरलेली नसली तरी परिक्षा घेऊन परिक्षेचा निकाल राखीव ठेवणे किंवा शाळेचा दाखला (LC) राखुन ठेवणे संस्थेच्या हातात आहे. परंतु असे न करता थेट परिक्षेपासून वंचित ठेवत विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य आहे का ?
३) जा विद्यार्थींनीला (RTE) अंतर्गत मोफत शिक्षणाची सुविधा मिळाली आहे तीला परिक्षेपासून वंचित ठेवणे हा गुन्हा नव्हे का ?
४) परिक्षा पेपर देता येत नसल्याने संबंधित मुली सारख्या रडत असून मोठ्या मुलीने जेवण सोडले असल्याचे तसेच ती झोपत नसून रात्रीही रडत बसते अशी माहिती शेजारच्या लोकांनी सांगीतली आहे.
(संस्थाचालकांचा हिटलर शाहीचा फतवा)
पचोरा शहरातील एका नामांकित शाळेत पालकांनी वेळेवर फी भरली नाही म्हणून संबंधित संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांना परिक्षेत बसु दिले नाही. अशी कैफियत पाचोरा शहरातील बहिरम नगर परिसरातील दिपक शांताराम पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.
(दिपकने मागील काळात भरलेल्या फीच्या पावत्या)
(विशेष म्हणजे दिपकच्या एका मुलीचा (RTE) मधून मोफत शिक्षणाची सुविधा मिळाली आहे. वास्तविक पहाता शाळेची थकीत फी व या (RTE) योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या कु. श्वेताचा काहीएक संबंध नसतांनाही तिलाही परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे दिपक याने सांगितले आहे.)
कैफियत मांडतांना दिपक पाटील.
याबाबत सविस्तर हकिगत अशी की पाचोरा येथील बहिरम नगर परिसरातील रहिवासी दिपक शांताराम पाटील यांच्या तीन मुली पाचोरा येथील सिंधी कॉलनी परिस्थितील गुरुकुल इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत पैकी कु. श्वेता ही इयत्ता ६ वी, कु. पायल ही ३ री व वैष्णवी ही २ रीच्या वर्गात शिकत आहेत. पैकी वैष्णवी हिस (RTE) च्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सवलत मिळाली आहे. दिपक भूमिहीन शेतमजूर असल्याने परिस्थिती बेताची आहे. तरीही रात्रंदिवस एक करत मुलींना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी दिपक धडपड करत आहे.
त्याने मागील काळात शाळेची फी भरण्यासाठी कुठेही कुचराई केलेली नसून फी भरली असल्याच्या पावत्या त्याने पुराव्यानिशी दाखवल्या आहेत. मात्र मागील वर्षापासून कोरोणाची लागण होऊन लॉकडाऊन झाल्या कारणाने हाताला काम नसल्याने व याच कालावधीत वडीलांना अर्धांवायूचा झटका आल्याने वडीलांच्या उपचारासाठी दवाखान्यात पैसा खर्च झाल्यामुळे दिपकने मागील वर्षाची व चालु वर्षाची थकीत फी भरलेली नाही.
म्हणून यावर्षी वार्षिक परिक्षा सुरु असून दिपक याने त्याच्या पाल्यांची फी भरलेली नसल्याने शाळेच्या संस्थाचालकांनी व मुख्याध्यापकांनी श्वेता, पायल व वैष्णवी यांना उत्तरपत्रिका देण्यासाठी टाळाटाळ करत परिक्षेपासून वंचित ठेवले आहे. आपल्या सोबतचे मुल, मुली परिक्षा देत आहेत व आपण फी भरलेली नाही म्हणून आपणास परिक्षा देता येत नाही, आपले एक वर्ष वाया जाईल म्हणून मुली रडत, रडत घरी आल्या व तिघांनी घरी जाऊन खरा प्रकार सांगितला त्या तिघेही मुली अन्नपाणी न घेता दिवसभर रडत होत्या. ही परिस्थिती पाहून दिपक हतबल झाला व त्याने कुठे उसनवारी किंवा व्याजाने पैसे मिळतील का म्हणून अनेकांचे दरवाजे ठोठावले मात्र यात यश आले नाही.
म्हणून दिपक दुसऱ्यादिवशी थेट शाळेत जाऊ मुख्याध्यापकांसमोर मी लवकरच फी भरणार आहे माझ्या मुलींना परिक्षेपासून वंचित ठेऊ नका अशी विनंती करु लागला परंतु संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी दिपकचे काहीएक ऐकून न घेतल्याने दिपक अक्षरशा त्यांच्या पाया पडून विनवण्या करू लागला तरीही संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी दिपकला हाकलून लावल्याचे दिपक याने रडत, रडत प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे.
तदनंतर हतबल झालेल्या दिपकने दिनांक ०५ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साो. जिल्हापरिषद, जळगांव. यांच्याकडे अर्ज करुन सत्य परिस्थिती कथन करत मी फी भरण्यासाठी बांधील आहे व लवकरच फी भरणार आहे अशी ग्वाही देत माझ्या पाल्यांना परिक्षेपासून वंचित ठेऊ नये अशी मागणी केली आहे.
दिपकने आपल्या विरोधात अर्जफाटे केले असल्याची जाणीव संस्थाचालक यांना झाल्याबरोबर त्यांनी आपले पाप झाकण्यासाठी दिपकवर खोटे आरोप करत पाचोरा पोलिस स्टेशनला तक्रार देण्याचा केविलवाणा प्रकार केला असल्याचे खात्रीपूर्वक समजले आहे.
(दिपकने केलेल्या अर्जातील मजकूर पुढील प्रमाणे)
माझी पाल्य नामे कु. श्वेता दिपक पाटील हि गुरुकुल इंग्लिश मिडीअम स्कुल, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव येथे सन २०२१-२२ या शैक्षणीक वर्षी इ. ६ वी या वर्गात शिकत आहे.
तसेच माझी दुसरी पाल्य नामे कु. वैष्णवी दिपक पाटील हि गुरुकुल इंग्लिश मिडीअम स्कुल, पाचोरा ता. पाचोरा जि.जळगांव येथे सन २०२१-२२ या शैक्षणीक वर्षी इयत्ता २ री या वर्गात शिकत आहे.
कोरोना काळामुळे उद्योगधंदे बंद असल्याने काही कामधंदा नसल्याने आर्थिक बेरोजगारी मुळे व माझी परिस्थिती हलाकिची असल्यामुळे मी रोजंदारीवर कामधंद्यास जात आहे. त्यात माझी मोठी मुलगी कु. श्वेता हिची चालु वर्षाची फी भरली गेली नाही. त्यामुळे संबंधीत शाळेतील मुख्याध्यापक यांनी तीला परिक्षेस बसु न देता वर्गाचे बाहेर उभे केले व तीचा मानसिक छळ देखील केला.
माझी दुसरी मुलगी कु. वैष्णवी हिचा RTE मध्ये मोफत शिक्षण घेत असुन सुध्दा तीच्या शिक्षणासाठीची फीची वारंवार मागणी केली जात आहे. शिक्षण मोफत असुन सुध्दा माझे कडून सदर मुख्याध्यापक हे पैशांची मागणी करत आहेत.
महाशय सदर शाळेत जावून विचारणा केली असता, तेथील मुख्याध्यापक हे दमदाटीची भाषा वापरून दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर शाळेचा मनमानी कारभार चालु आहे. तरी आपल्या स्तरावरून चौकशी करून संबंधीत शाळे विरूध्द तसेच संबंधीत मुख्याध्यापक यांचे विरूध्द कायदेशीर कारवाई करून, माझे मुलींना शिक्षणापासुन वंचीत न राहता त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा हि नम्र विनंती.
सोबत मुख्याध्यापक यांनी दिलेले लेखी उत्तर जोडत आहे.
आपला विश्वासु
(दिपक शांताराम पाटील.)
वरील प्रकाराबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सत्यता जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित मुख्याध्यापकांनी समाधानकारक उत्तर न देता मुलींच्या पालकांना दोषी ठरवण्यासाठी प्रयत्न करत (हम उसके खिलाफ पुलिसमे जाकर उसे कभिभी उठा सकते है, फी भरणे के बाद हम परिक्षा लेंगे) अशी भाषा करत कायदा आमच्या बापाचाच आहे असे दावखण्याचा प्रयत्न करुन प्रसारमाध्यमांनाही दडपणाखाली घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाणवले.