भुवनेश दुसाने प्रतिनिधी
यावल :- तालुक्यातील दहिगाव येथील मुळच्या रहिवासी २७ वर्षीय तरूणाने पुणे येथे आत्महत्या केली ही घटना शनीवारी दुपारी घडली असुन मयत तरुणाचे नाव पुष्कर नंदकुमार महाजन असे आहे.
दहिगाव ता . यावल येथील पुष्कर नंदकुमार महाजन वय २७ हा विवाहित तरूण गेल्या चार वर्षांपासुन पुणे येथे एका कंम्पनीत नोकरीस होता व तो पत्नी व दोन वर्षीय मुलगी सह पुण्यात राहत होता दरम्यान या तरुणाने दिनांक ९ एप्रिल शनीवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पुणे येथील त्याचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . घटनेची माहिती तळेगाव पुणे पोलिसांना देण्यात आली त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही टीनु नंदकुमार महाजन याने तळेगाव पोलिसात दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . मयत तरूणाच्या पश्चात आई – वडील , भाऊ पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे . त्याने अशा प्रकारे केलेल्या आत्महत्येने गावा सह परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे .