प्रतिनिधी – एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि.१० एप्रिल रोजी शहरातील महात्मा फुले युवा क्रांती मंच तर्फे सायंकाळी सत्यशोधक समाज संघाचे संयोजक व प्रचारक सत्यशोधक अरविंदजी खैरनार,राष्ट्रीय महासचिव सी.सुरेश झा ल्टे यांचे व्याख्यान महात्मा फुले पुतळ्याजवळ संपन्न झाले,११ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्याला शहरातील मान्यवरांच्या व उपस्थित सर्वांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मोटासायकल रॅली काढण्यात आली.संध्याकाळी महात्मा फुले युवा मंचचे पदाधिकारी,कार्यकर्ते,इतर संघटनाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शहरातील मान्यवरांच्या सोबत सजीव देखाव्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील महात्मा फुले हायस्कूल,टेनिस क्लब,नाभिक समाज,शाळा,महाविद्यालय,सरकारी कार्यालये येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करुन त्यांना अभिवादन केले.