तालुका प्रतिनधी- राहुल आगळे : नंदुरबार जिल्हा तळोदा तालुक्यातील तरावद पाटील कुटुंबीयांची शिंदखेडा तालुक्यातील येथे रसवंतीवर हरविलेली दोन लाखांची रोकड व सोने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज असलेली बॅग साळवे येथे अमोल भारती व त्यांच्या मित्र परिवाराने निस्वार्थ पणे परत केल्याने पाटील कुटुंबीयांच्या आनंदाश्रू तराळले. दरम्यान, अमोल भारती व मित्र परिवाराने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील तऱ्हावद येथील मुकुंद पाटील पुण्याहून गावाकडे परतत असताना त्यांनी चिमठाणा येथील एका रसवंती वर उसाचा रस घेतला. यावेळी त्यांच्याजवळ असलेली पर्स अनावधानाने त्या ठिकाणी विसरले. काही वेळानंतर तेथे उपस्थित असलेले साळवे येथील अमोल भारती , निंबा गिरासे, गौरव गिरासे ,गणेश पाटील, परेश कोळी, तुषार चौधरी ,भुषण पाटील युवकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात तीन तोळे वजनाची सोन्याची चैन सोन्याची पोत तसेच रोख रक्कम आढळून आली. सदरची रक्कम नेमकी कोणाची याबाबत त्यांनी पर्समधील चिठ्ठीवरून शहादा येथील सोनाराकडे संपर्क साधला मात्र उपयुक्त माहिती मिळू शकली नाही. यामुळे युवकांनी इथेच काही वेळ वाट पाहिली. यादरम्यान पर्स गहाळ झाल्याचे पाटील कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने ते दोंडाईचाहुन पुन्हा चिमठाणा येथे परत आले. यावेळी विचारपूस करू लागल्याने उपस्थित युवकांनी खात्री पटवून सदरची बॅग त्यांच्या स्वाधीन केल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. यावेळी मुकुंद पाटील यांनी युवकांना काही पैसे बक्षीस म्हणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकांनी सुरवातीला प्रामाणिकपणा बक्षिसाची रक्कम नाकारत निस्वार्थ वृत्तीने दर्शन घडविल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे आहे. साळवे येथील दशनाम गोस्वामी समाजाचे पदाधिकारी किरण भारती यांचे अमोल भारती पुतणे आहेत. त्यांच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे
.