प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – धडगाव तालुक्यातील पौला येथे पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरुन आई – वडीलांसह मुलाला लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धडगाव तालुक्यातील पौला येथील हान्या तेरक्या पाडवी यांनी रुल्या रामा तडवी यांच्या नातेवाईकांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . या कारणावरुन हान्या पाडवी यांच्यासह वडील तेरक्या झिंग्या पाडवी , आई कर्मीबाई तेरक्या पावरा यांना रुल्या रामा तडवी , दिनेश रुल्या पाडवी , सामा मालसिंग पाडवी व सुरेश हुन्या पाडवी सर्व रा.पौला ता.धडगाव यांनी लाकडाने मारहाण करुन दुखापत केली . तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली .
या बाबत हान्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोना . दीपक वारुळे करीत आहेत .