प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – अक्कलकुवा तालुक्यातील कैजाला येथे ऊसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एकावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , अक्कलकुवा तालुक्यातील डनेलचा वाजवापाडा येथील सामा सोत्या पाडवी यांनी बावा शिवा वळवी रा.कंजाला ता.अक्कलकुवा यांना चार वर्षापूर्वी ऊसनवार दिलेले एक हजार रुपये परत मागितले . याचा राग आल्याने सामा पाडवी यांना बावा वळवी याने धारदार शस्त्राने डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन दुखापत केली . तसेच शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली .
या बाबत सामा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात बावा वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . अरुण सैंदाणे करीत आहेत .