मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर असं त्यांचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी आत्महत्या केल्याचं कळताच मुंबई पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रजनी कुडाळकर यांचा मृतदेह पोलिसांनी राजावाडी पोलिस स्थानकात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
मंगेश कुडाळकर मुंबईतील कुर्ला विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. येथीलच राहत्या घरी रजनी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. पोलीस कुडाळकर यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.