प्रतिनिधी उमेश महाजन
एरंडोल: भास्कर रामा माळी वय ४७ वर्ष हे आईचे सव्वा महिन्याचे श्राद्ध करून ब्राह्मणे तालुका एरंडोल येथून सकाळी त्यांच्या पत्नी ला त्यांनी कालीपिली गाडीत बसवून दिले व ते स्कुटी ने एरंडोल कडे येत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली त्यांच्या पोटावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्यामुळे ते जागीच ठार झाले ही घटना शनिवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अंजनी धरणाजवळ एरंडोल कासोदा रस्त्यावर घडली.
भास्कर रामा माळी हे साईनगर एरंडोल येथे राहत असून एम एच १९ एटी ८२९९ क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्कुटी ने बाम्हणे येथून एरंडोल कडे येत होते. त्या वेळी अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला ठोस मारून वाहन चालक फरार झाला. व भास्कर रामा माळी हे जागीच गतप्राण झाले. माडी हे भेंडीच्या काट्यावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. आईचे श्राद्ध विधी आटोपून एरंडोल कडे परत नाऱ्या भास्कर माळी यांच्यावर अपघाताच्या निमित्ताने क्रुर काळाने झडप घातली त्यांच्या या अपघाती निधनामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.