प्रतिनिधी उमेश महाजन
एरंडोल:-विखरण शिवारात २० एप्रिल रोजी नाना चैत्राम थोरात राहणार आमदळ यांच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम प्रसंगी त्यांची १३ वर्ष २७ दिवस वयाची भाची कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेली. मामाच्या मुलीचा लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम असताना अल्पवयीन भाचीला पळवून नेण्याची घटना घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे
विखरण शिवारात सदर मुलगी तिच्या आई-वडिलांसह २० एप्रिल रोजी सायंकाळी पोहोचली असता रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तिच्या वडिलांना झोपेतून जाग आली असता त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे आढळून आले म्हणून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तसेच हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर असलेल्या नातेवाईकांकडे सुद्धा विचारपूस करण्यात आली मात्र ती आढळून आली नाही. म्हणून त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला तिला कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दिली . पुढील तपास मिलिंद कुमावत ,अखिल मुजावर, संदीप पाटील, संतोष चौधरी, विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.