नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील बामखेडा त. त. या गावात प्रत्येक मूल शाळेत जाईल एक ही मुल घरी न राहील या शासनाच्या महत्वपूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद देत गावातील शिक्षक वृंदांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद केंद्र शाळा बामखेडा त.त.(ता.शहादा) येथे शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय उत्साही,आनंदी वातावरणात नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमात आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान म्हणून ख्याती असलेले जि. प. नंदूरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सतिश चौधरी साहेब तसेच श्री.जगराम भटकर साहेब प्राचार्य डायट नंदुरबार , श्री.डी.टी.वळवी साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स.शहादा.यांच्या संकल्पनेची महत्वाची साथ लाभली.
मेळाव्याच्या सुरुवातीला शैक्षणिक वर्ष 2022-23 ला शाळेत प्रवेश पात्र असणाऱ्या नवागत विदयार्थ्याचे संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर त्या चिमुकल्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, फुगा व चॉकलेट देण्यात आले . मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्याचबरोबर आकर्षक सेल्फी पॉईंट,माझा ठसा,पाउले वळाली शाळेच्या वाटेला, सुंदर रांगोळी, रंगीबेरंगी सॅश, फुग्यांची आकर्षक सजावटइ. उत्कृष्ट कलाकुसरीचा वापर हे चिमुकल्यांचे व गावातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.प्रकाश नानकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल साळुंखे यांनी केले. प्रसन्न वातावरणात दाखलपात्र मुलांचे विकासपत्र भरून घेण्यात आले. विकास पत्रातील शरिरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास, गणनपूर्व तयारी इ.साहाय्याने मुलांच्या पूर्वतयारी चा आढावा घेतला.
स्टाॅलला भेट देण्यासाठी टेबल क्रमांक 01 ते 07 सर्व माहिती सर्व मान्यवरांना देण्यात आली.शाळापूर्व तयारी मेळावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यी ,पालक यांची विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत दाखल होण्यापूर्वीपासून काय भूमिका असेल यासंदर्भात सविस्तर सखोल माहिती देण्यात आली.सर्व प्रमुख अतिथी यांनी मनोगत व्यक्त केले व शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय प्रभावीपणे राबवीत असल्याबद्दल शाळा,शिक्षक,पालक यांचे तोंडभरून कौतुक केले.तसेच या मेळाव्याचे स्वरूप फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करीत मेळाव्याबाबत आणि शिक्षक बांधवांच्या नियोजनाविषयी कौतुक उद्गार करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.आणि गावातील सर्व मान्यवरांनी सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. मेळाव्यात विशेष सहकार्य श्री.मनोज बापु चौधरी सरपंच बामखेडा.त.त. श्री.भगवान भिल शा. व्य.स.अध्यक्ष बामखेडा त.त.श्री.छगन शिंपीसर मुख्या.जि. प. शाळा हिंगणी ,श्रीमती. ज्योती हाडे मॅडम जि. प.शाळा हिंगणी ,मयुर धनगर जि. प. शाळा. हिंगणी,शोभाबाई सोनार ,सुनिता गव्हाणे,ललिता बोरसे यश सोनवणे ,रवींद्र पावरा, संदीप सोनवणे,योगेश भोई,पूनम गवळे, सरला गवळे,अश्विनी गवळे,सिध्दार्थ कापुरे,राजेंद्र गवळे आदी उपस्तीत होते.