बेकायदेशिररित्या घर बांधकाम बखळ जागा भू माफियाकडून लाटण्याचा प्रयत्न , रहिवाश्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – नंदुरबार शहरातील वैशाली नगरातील सर्वे नं . ३७/१ व ३७/२ मध्ये रस्त्यावर भू माफियाकडून कुठलिही परवानगी न घेता बेकायदेशिररित्या घर बांधकाम केले जात आहे .
सदर रस्ता वहिवाटीचा असल्याने यामुळे रहिवाश्यांचा रस्ताच बंद होणार आहे . त्यामुळे सदर व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी , अशीमागणी रहिवाश्यांतर्फे नंदुरबार नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे .
याबाबत निवेदनात म्हटले आहे की , वैशाली नगरात राहत असलेले रहिवासी आणि प्लॉट नं . ३५ लागुन वहिवाट रस्ता असून सदर जागेवर विहीर आहे . यामुळे याठिकाणी कुठलेही बांधकाम होणार नाही तशी मांडणी करण्यातआली आहे . त्याठिकाणी कोणताही प्रकारचा प्लॉट टाकण्यात आलेला नाही . या रस्त्यावरून पूर्वीपासून कॉलनीतील रहिवासी वावरत आहे .
मात्र नंदुरबारातील काही भू माफियांकडून बेकायदेशिर पणे जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे . याकडे संबंधित पालिका प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे , अशी मागणी निवेदनातून ,करण्यात आली आहे .
यावेळी पालिकेच्या मुख्याध्याधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले आहे . निवेदनावर लक्ष्मण भिका जाधव , गजराबाई अर्जुन कोकणी , मंगलाबाई शामराव गावित , जितेंद्र मराठे , कमलबाई मराठे , सुनिता कदम , मीना अजमेरा , जयेश पाटील , के . बी . वळवी , तांबोळी , गणेश ठाकूर आदींच्या सह्या आहेत .