*नंदुरबार – रवींद्र गवळे*
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथे भीम आर्मी संस्थापक भाई चंद्रशेखर आजाद भिम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे भीम आर्मी राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्तू मेंढे भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख सिताराम गंगावणे भीम आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ रगडे यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाखाली दिनांक १२/०५/२०२२ गुरुवार रोजी सायंकाळी ७:०० वाजता बामखेडा त.त.ता.शहादा या गावात सर्व भीम आर्मी शहादा तालुकाचा टीमचा उपस्थित सर्व बामखेडा गावातील सर्व समाज बांधवांच्या आणि भीमसैनिकांचा उपस्थित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन अभिवादन करून बैठक घेण्यात आली. या बैठकीत भीम आर्मी चे बामखेडा येथे फलक अनावरणाच्या नियोजन करण्यात आले. भीम आर्मी ही संघटना सर्व समाजांसाठी व अन्यायास वाचा फोडण्याचे काम करीत असते. तसेच काही समाजकंटकांकडून अन्याय होत असल्यास भीम आर्मी चे पदाधिकारी हे नेहमी आवर्जून उपस्थित असतात व न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात.तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटना फक्त एकच समाजासाठी मर्यादित नाही.सर्व समाजाचा मदतीसाठी ही संघटना आहे.व संघटना मध्ये कशा पद्धतीने काम करावे. कशा पद्धतीने संघटना वाढवावी सर्व समाज बांधवांच्या भाई चारा प्रमाणे सर्वांनी एकजुटीने काम करावे. अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्व समाजाच्या मदतीला धावून जाणारी संघटना म्हणजे भीम आर्मी सामाजिक संघटना आहे.असे मनोगत या बैठकीत नंदुरबार जिल्हा संघटक भैय्यासाहेब पिंपळे यांनी व्यक्त केले.या बैठकीत
उपस्थित भीम आर्मीचे पदाधिकारी राहुल आगळे शहादा तालुका अध्यक्ष, लक्ष्मण गवळे उपाध्यक्ष, राहुल सैदाणे शहादा तालुका संघटक, शहादा शहराध्यक्ष संदीप पानपाटील यांचा सह बामखेडा येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते. या कार्यमाचे सुत्रसंचालन रवींद्र गवळे यांनी केले तर उपस्थित पदाधिकार्याचे आभार राहुल सैंदाणे यांनी मानले.