प्रतिनिधी – उमेश महाजन
एरंडोल: एरंडोल जवळील उमरदे गावाजवळील खदानवाडी जवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा तालुक्यातील मराठखेडे येथील रहिवाशी पंकज एकनाथ पाटील ( वय २२) हा तरुण दि.१५ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोटार सायकल क्र.एम.एच.१९ – डी एक्स – ४८६७ ने जळगाव येथे खाजगी कामानिमित्त जात असल्याने वराड येथे मामा नगराज एकनाथ पाटील यांच्याकडे थांबला व मामाला सोबत सकाळी १०:४५ वाजता जळगाव येथील काम आटोपून मामा व भाचा दोघे म्हासावद मार्गे मराठखेडे येथे येण्यास निघाले असता. उमरदे येथील खदान वाडी येथे अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटार सायकल स्लिप झाली व मोटार सायकल वर मागे बसलेला पंकज हा डांबरी रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला तसेच मामा नागराज पाटील हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला व पाठीला लागले.त्याच अवस्थेत मामा नागराज पाटील यांनी रस्त्यावरील रिक्षा थांबवुन पंकज यास एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.उपचार दरम्यान पंकजचा मृत्यु झाला.पंकज हा अविवाहित असुन त्याच्या पश्चात,आई,भाऊ,बहीण असा परिवार आहे.
नगराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र तायडे,जुबेर खाटीक,अनिल पाटील,पंकज पाटील,राजेश पाटील तपास करीत आहेत.