नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तथाकथित संस्थाचालक, शाळेच्या लिपीकासह पांच जणाविरुध्द दाखल फौजदारी गुन्हयात कारवाई करण्यांस
पोलिस प्रशासनाकडून टाळाटाळ व दिरंगाई कां?


धुळे – येथील नॅशनल उर्दू हायस्कूल,धुळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक इकबाल अहमद महंमद नजीर यांनी धुळे येथील न्यायालयांत कलम १५६/३ प्रमाणे पुराव्यानिशी दाखल केलेल्या अपिलावर कामकाज होऊन दिनांक १६/०३/२०२२ रोजी सदरचे अपिल मंजर करण्यांत आले असून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादनुसार आरोपी (१) शमसुल आरफीन महंमद शरीफ रा. अन्सारनगर मशिदजवळ, धुळे (२) आबिद हुसेन महंमद याकुब (कनिष्ठ लिपीक) रा. आयेशानगर, धुळे (३) मुस्तुफा महंमद इस्हाक रा. वडजाईरोड, धुळे (४) इकबाल अहमद महंमद शाबान रा.मिल्लतनगर, स्लॉटर हाऊसच्या मागे, धुळे (५) मुनाफ अब्दुल रहेमान शेख रा. शहीद अब्दुल हमीदनगर, नटराज सिनेमासमोर, धुळे अशा पांच आरोपीविरुध्द चाळीसगांवरोड पोलिस स्टेशन धुळे येथे गुन्हा रजि.नं.६७/२०२२ नुसार भा.द.वि. कलम ३८४, ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे, याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांसह विविध न्युज चॅनेलवर व प्रसार माध्यमामध्ये सविस्तर वृत्त झळकलेले आहे.
सदर गुन्हयाचा तपास चाळीसगांवरोड पोलिस स्टेशनचे सब पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. मात्र गुन्हा दाखल होवून दोन महिन्याचा कालावधी होत आला असला तरी आजपर्यंत तपास पुर्ण झाल्याचे व आरोपीतांना अटक केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सर्व आरोपी हे मोकाट राजरोसपणे समाजात वावरत आहेत. एवढेच नव्हे तर सदर दाख्ल गुन्हयातील आरोपी क्रं. ४ इकबाल अहमद महंमद शाबान हा मे. न्यायालयाची किंवा पोलिस प्रशानाची कोणतीही परवानगी न घेता पंधरा दिवसांची विदेशवारी करुन नुकताच शहरात आलेला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. कारण आरोपितांविरुध्द मे. न्यायालयांच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्हयातील कलम हे अजामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना अटक करुन न्यायालयांत उभे करुन तपासासाठी पोलिस कस्टडी रिमांड व मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडची मागणी करुन व त्यांना ताब्यात घेवून त्यांनी सदर गुन्हयात बनावट तयार केलेले मुळ कागदपत्र व ते तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य ताब्यात घेवून सदर गुन्हयात अजुन कोणा-कोणाचा सहभाग आहे इत्यादी सखोल तपास करणे गरजेचे होते व आहे. मात्र पोलिस प्रशासन आरोपितांना अटक न करता तपासाच्या नावांवर वेळ मारुन नेत असल्याचे दिसून येत आहे. परीणामी आरोपी हे व त्यांचे हस्तकांमार्फत फिर्यादीवर प्रकरण मागे घेण्यासाठी व साक्षीदारांवर साक्ष फिरविण्यासाठी दबाव व दडपण आणीत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. पोलिस प्रशासनाने मे. न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गंभीर व अजामीनपात्र गुन्हयातील आरोपितांना त्वरीत अटक करण्याची कारवाई त्वरीत करण्यांत यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:31 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 34 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!