श्री गणेश क्लासेसचे संचालक श्री. हेमराज लोटन पाटील सरांचे सुपुत्र, नवोदित लेखक श्री. गणेश पाटील (इमॅन्यूएल व्हिन्सेंट सँडर) यांचे ‘5960 आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा’ हे पुस्तक शनिवार दि. १४ मे २०२२ रोजी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरी येथे सांगाती प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक अक्षय शेलार, प्रकाशक भारत निलख, सोबतच प्रकाशित झालेल्या ‘एका जंगलाची कथा’ या लघुकादंबरीचे लेखक राजेंद्र ठोंबरे, लेखन क्षेत्रातील इतर मान्यवर आणि गणेशच्या लेखनावर प्रेम करणारे वाचक आणि मित्र उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याची सुरुवात श्री. गणेश पाटील यांचा सत्कार करून झाली. त्यांनतर प्रकाशकाचे मनोगत, नवोदित लेखकांचे मनोगत, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आणि मग पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्यानंतर श्री. गणेश पाटील यांची मुलाखतही घेण्यात आली. सर्वांनी नवोदित लेखक श्री. गणेश पाटील यांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी श्री. हेमराज पाटील सरांनी आपल्या लाडक्या मुलाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. व आभार प्रदर्शनासोबतच कार्यक्रमाची सांगता झाली.
5960 च्या कथांचे पुस्तक मागवण्यासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.
भारत निलख : 8329536606
निखिल वाघमारे : 8999989763