प्रतिनिधी – (हरिश्चंद्र महाडिक )
सुतारवाडी: उघड्यावर लघुशंखा करू नये असे सांगणाऱ्या व्यक्तीचा राग मनात धरून त्याला मारहाण केल्यानंतर त्याला भाजी कापण्याच्या सुरीने भोसकल्याची गंभीर घटना रोहा तालुक्यातील कोलाड जवलील पुई गावात घडली असून या प्रकरणी कोलाड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून या बाबत अधिक तपास युद्ध पातळीवर सुरू आहे .
हाती आलेल्या माहिती नुसार या बाबत सविस्तर वृत्त असे कि सोमवार दि ६ जून रोजी कोलाड नजिक पुई गावाच्या हद्दीत कालव्यावर अंघोळीला आले होते.यातील काही तरुण उघड्यावर लघुशंखा करीत होते यावेळी फिर्यादी शंकर दिवेकर यांच्या घरातील महिला या अंगणात बसल्या होत्या त्यामुळे येथे लघुशंखा करू नका असे फिर्यादी यांनी सांगितले यावेळी तरुणांनी फिर्यादी याला शिवीगाळ केली.नंतर तरुणांना गावाबाहेर जाण्यासाठी सांगितले याचा राग मनात धरून आरोपीनी काही तरुण घेऊन सायंकाळी ७.३० सुमारास फिर्यादीच्या घरी आले व शिव्यागाळी करू लागले यावेळी फिर्यादीची सून रागिणी हिने त्यांना तेथून जाण्यास सांगितले.परंतु आरोपीपैकी दोघांनी रागिणीच्या गळयाला हाताचा विळखा घातला. सुनेला सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे आत्माराम दिवेकर हे सोडविण्यासाठी गेले असता आरोपी प्रणय खाडे यांनी आत्माराम यांच्यावर डाव्या कुशीत सुरीने भोसकले यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२६,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रणय प्रदीप खाडे व रविंद्र गावडे दोघेही रा. गोवे फाटा शब्बीर शेठ बिल्डिंग ता. रोहा व प्रतिकेश भरत शिंदे रा.रासळ ता. सुधागड या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाच ते सहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत सदर गुन्ह्याप्रकरणी कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एस. ए. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. एल.घायवट हे अधिक तपास करीत आहेत.