नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील पीएमसी माध्यमिक विद्यालय व अ.सु. पटेल प्राथमिक विद्यामंदिर या विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यात माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवी व प्राथमिक विद्यालयातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक विद्यालयातील पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावणारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पीएमसी माध्यमिक विद्यालयाचे व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. चौधरी परिवेक्षक आर. एस. चौधरी ए .बी. चौधरी एन.एम .भलकर शिक्षक वृंद उपस्थित होते. तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यु. एम. चौधरी बी.एन .पटेल डॅडी जगताप श्रीमती एस. एस. धिवरे आदी शिक्षकवृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.