*शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे*
नंदुरबार जिल्हा पोलिसांनी स्थापन केलेल्या मिसिंग डेस्कच्या माध्यमातून जिल्हातून १० पुरुष , तर १७ महिलांना शोधण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी बेपत्ता पुरुष व महिलांच्या शोधासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या . त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक अधिकारी व एक कर्मचारी यांचे पथक तयार करून नियंत्रणासाठी त्यावर जिल्हा मुख्यालयात मिसिंड डेस्क स्थापन करण्यात आला त्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक भगवान धात्रक यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शहर पोलीस ठाणे अंतर्गत तीन पुरुष व तीन महिला उपनगर पोलीस ठाणे एक महिला, तालुका पोलीस ठाणे एक महिला, नवापूर एक पुरुष व दोन महिला, शहादा पोलीस ठाणे दोन पुरुष व पाच महिला, सारंगखेडा, म्हसावद, धडगाव पोलीस ठाणे अंतर्गत एक पुरुष, अक्कलकुवा पोलीस ठाणेअंतर्गत एक पुरुष व दोन महिला तर तळोदा पोलीस ठाण्याअंतर्गत दोन महिलांना शोधून काढण्यात आले.