प्रतिनिधी – अनिल बोराडे
धुळे: राष्ट्रीय महामार्ग क्र.752G या रस्त्यावरील पिंपळनेर शहराच्या हद्दीतुन जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असुन त्या संदर्भात आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अप्पर तहसीलदार, पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले आहे. या विषयावर येत्या 7 दिवसात कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन भाजपा व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने छेडण्यात येणार असुन हा संपुर्ण महामार्ग बेमुदत कालावधीसाठी बंद पाडण्यात येईल. अशा विनंतीवजा इशारा आज देण्यात आला असुन प्रशासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी तातडिने दाखल घ्यावी पिंपळनेर शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था ही अतिशय बिकट झालेली आहे.आहे त्या परिस्थितीत नागरिक दैनंदिन वापर करावा लागत आहे परंतु कोणीही दखल घेत नाही. संपूर्ण सटाणा रोड, स्टेट बँक जवळ, पंचमुखी कॉर्नर, महावीर भवन, बस स्टॅंड या प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले असून शहरातील मोठे अवजड वाहने देखील ह्या रस्त्याचा वापर करीत असल्याने शहरातील सर्वसामान्य रोजाना त्रास सहन करावा लागत आहे पिंपळनेर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था व चाळनी झाल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल ही साचला असून रस्ताच नसल्यासारखी स्तिथी निर्माण झाली आहे. नवीन पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडल्याने मोठा अपघात होहू शकतो. हे खड्डे तात्पुरते माती, मुरूम, टाकून बुजविले जातात. मात्र दोन-तीन वर्षांपासून त्याची कायमची दुरुस्ती केली जात नाही. पावसामुळे सरस्त्याची दुरवस्था झाली असून वाहने माती मुरमामुळे चिखल होहून दुचाकीस्वार घसरत आहेत. अनेकदा ( MSRDC ) कंपनीकडे रस्ता दुरुस्थिची मागणी केली. मात्र कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे सात दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्थी करण्यात यावी.असे न झाल्यास रस्ता बंद करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे.