पिंपळनेर (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील पिंपळनेर पासून नवापूर कडे जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून पाहू लागले. सतत पडणाऱ्या पावसामुळे कुडाशी पासून दोन किलोमीटर अंतरावरील आमसरे धरण पहिल्याच पावसात ओव्हर फ्लो झाले होते. तर सलग तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शेंदवड येथे उगम पावणाऱ्या पांझरा नदीने रौद्ररूप धारण केले .कुडाशी पासून डांगशिरवाडेकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे. पांजरा नदीवरील कुडाशीचे अमरधाम पाण्याखाली गेले आहे. एवढे जोरात नदीचा प्रवाह सुरू असल्यामुळे उद्या परवाकडे लाटीपाडा धरण ओव्हर फ्लो झाले म्हणून आश्चर्य वाटणार नाही. सलग तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला . परंतु काहींचे नुकसानही झाले .शंभर टक्के पश्चिम पट्ट्यातील सर्व गावात पेरणी सुद्धा झाली आहे .यापूर्वीच दोन पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बरेचसे क्षेत्र पेरणी वभात.नागली लागवडीखाली आले आहे. आत्ताच्या पावसामुळे नागली व भाताची रोपणी मोठ्या प्रमाणावर होऊन बळीराजा सुखावला आहे. लहान मोठी सर्व धरणे, बंधारे आता पाण्याखाली गेली आहेत. जामखेली, काबऱ्या खडक मालनगाव ही तीनही धरणे भरल्यानंतर साक्री तालुक्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो .या धरणांमुळे धुळे तालुक्यासाठी वरदान ठरणारे अक्कलपाडा ही काही दिवसात असाच वरून राजा बरसत राहिल्यास ओव्हर फ्लो होईल या शंका नाही. 15 जुलै च्या आत साखरी तालुक्यातील धरणे भरून पाहू लागल्यास अक्कलपाडा भरण्यास वेळ लागणार नाही. हवामान खात्याच्या पुढील तीन दिवसाच्या मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे 20 जुलै च्या आत साक्री तालुक्यातील नदी नाले प्रवाही होऊन लवकरच साक्री तालुक्या बरोबर अक्कलपाड्यावर अवलंबून धुळे तालुक्यातील डेडरगाव ,नकाणे धरणे भरण्यासही मदत होईल यात शंका नाही.