नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आण्णा भाऊ साठे लोक टिळक यांच्या विचारांचा जागर करण्याची गरज व्याख्याते प्रशांत कोतकर

प्रतिनिधी- अनिल बोराडे, पिंपळनेर: कर्म आ मा पाटील कला वाणिज्य आणि कै अण्णासाहेब एन के पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील रासेयो विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्यामार्फत महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा बाळासाहेब आर एन शिंदे ,उपाध्यक्ष मा सुरेंद्रजी मराठे, कॉलेज कमिटी चेअरमन भाऊसो धनराजजी जैन, वस्तीगृह चेरमन मा हिरामणजी गांगुर्डे, कर्म आ मा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य मा अशोकजी मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच पत्रकार अनिल बोराडे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी के अहिरे यांनी भूषविले तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पिंपळनेर येथील शांताई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री प्रशांत कोतकर यांनी उपस्थितताना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार त्याकाळी समाजाला प्रेरित करणारे होते. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी आजही त्यांच्या विचारांची मोठी आवश्यकता आहे. असे तेआपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना म्हटले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख डॉ खरात यांनी केले .याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ मस्के यांनी लोकमान्य टिळकांवर व प्रा गवळी यांनी लोकशाहीर व कामगारांमधे प्रबोधन करनारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले विचार प्रकट केले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ पी के अहिरे यांनी अध्यक्षिय भाषण केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागाचे प्रा प्रदिप सावळे व रासेयोचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा नांद्रे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा चंद्रकांत घरटे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:12 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!