जिल्हा प्रतिनिधी- प्रविण चव्हाण
नंदुरबार, – : मुंबई, मुंबई शहर, ठाणे, रायगड,पालघर,नाशिक, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यासाठी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, मुंबई यांच्याकडून 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन अब्दुल कलाम आझद स्पोर्ट स्टेडियम,कौसा व्हॅली मुंब्रा ठाणे येथे करण्यात आले आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2022 पूर्वी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत,असे अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.