नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

‘सायबर अॅवरनेस फौंडेशन’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित



धुळे – सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी जगभरात सायबर ॲवरनेस फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या ब-याच वर्षांपासून सायबर क्राईम व सायबर जनजागृतीविषयी जनतेत, विद्यार्थ्यामध्ये, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती केलेली आहे. यासंबंधी त्यांनी लाखोहून अधिक सेमीनार, वर्कशॉपचेही आयोजन केले आहे व कोवीड – १९ च्या काळात सायबर गुन्हयाबाबत त्यांनी सर्वसामान्य जनता, पोलिस खात्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्याबाबत सावध करण्याचे कार्य केलेले आहे तसेच त्यांनी वेळोवेळी माहिती तंत्रज्ञान कायद्याविषयी मार्गदर्शन केलेले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत गुवाहाटी (आसाम) येथील इंडियन आवाज फौंडेशन व त्यांच्या अधिका-यांच्या निर्णयानुसार जगभरातून ५ हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले होते त्यापैकी त्यांनी हा पुरस्कार धुळयातील अॅड. चैतन्य एम. भंडारी यांच्या सायबर अवरनेस फौंडेशन या संस्थेला “बिझनेस अॅवार्ड – २०२२” दिला आहे.

हा पुरस्कार त्यांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी खानपारा, गुवाहाटी (आसाम) येथे इंडियन आवाज फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुणभा भट्टाचारजी व मोहंमद नजिम अहमद यांच्या हस्ते दिला जाणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड. चैतन्य एम. भंडारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:09 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!