प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार – :विनाकारण खोटा अर्ज देऊन पत्रकाराला मनस्ताप देणार्या तसेच दडपशाहीचे धोरण अवलंबून दरारा निर्माण करणार्या राहुल जगताप नावाच्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल. करण्यासंदर्भात नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार जितेंद्र जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज दाखल केला होता त्याचा राग येऊन आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी राहुल जगताप या ठेकेदाराने पोलीस विभाग पत्रकार जितेंद्र जाधव यांच्या विरोधात खोटा तक्रार अर्ज दिला होता.
परंतु झालेल्या प्रकारची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाने दखल घेत पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सदरील राहुल जगताप हा पत्रकारांच्या विरोधात विनाकारण खोटा अर्ज देऊन मनस्ताप देणार्या तसेच दडपशाहीचे धोरण अवलंबून दरारा निर्माण करणार्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. तसेच खोटा अर्ज देऊन प्रशासनाची दिशाभूल करणार्या जगतापची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,
अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देते वेळी सतीश गोसावी, विशाल माळी,जगदिश सोनवणे, दिलीप बडगुजर, हंसराज चौधरी, ज्ञानेश्वर गवळी,जगदीश ठाकूर, महेंद्र चौधरी, अनिल राठोड,प्रविण चव्हाण, सुभाष राजपूत,किशोर गवळी, विरेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.