DPT NEWS Network Dhule:भारताच्या स्वातंत्र्यता दिन अमृत महोत्सवा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे शहर तर्फे दिनांक 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी संध्याकाळी खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिराच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विविध वृक्षांची लागवड नदीकिनाराच्या परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे राजेन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला .
यावेळी मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख ,जिल्हा सचिव श्री संदीप जडे ,महिला सेना जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, मनसे धुळे तालुका सचिव विकास पाटील, मनसे धुळे शहर सचिव हरीश जगताप ,विभाग अध्यक्ष निलेश गुरव, सतीश पाटील, योगेश सैदाणे, राजेश दुसाने,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल परदेशी, रोहित नेरकर ,भूषण सोनवणे, शामक दादाभाई, विकी साळवे. शाखाध्यक्ष आदर्श पोलादे आदी पदाधीकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शहर सचिव हरीश जगताप यांनी केले होते.