Dpt News धुळे :- धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा ते कुसुंबा रस्त्यावर सुट्रेपाडा गावाला लागून नदी वरती 15 ते 20 फुट रुंदीचा पूल बांधून मिळावा. असे पत्र प्रशासनाला कविताताई अभिलाल देवरे यांनी दिले.
11/8/2022 रोजी मा. उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील मॅडम आणि मा.जिल्हा नियोजन अधिकारी ममता हाटकर मॅडम तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या ऑफिसला प्रत्यक्ष भेट देऊन कविताताई अभिलाल देवरे यांनी पत्र दिले धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा गावाजवळ दोन नद्या आहेत. त्या नद्यांमध्ये पावसाळ्यात कंबर, छाती पाणी राहते. आणि मोठा पूर आल्यावर कधी कधी पाच ते सात फूट पाणी चालते. त्यावेळेस गावातील व आजूबाजूचे पंचक्रोशीतील नागरिकांचे आपल्या शेतात जाणे येणे व शेतातील माल वाहणे थांबते. सुट्रेपाडा गावाची 80% जमीन या नद्या पार करून आहेत. तसेच आनंदखेडा,मेहेरगाव, कावठी, कुसुंबा या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा
आपल्या जमिनीत या नद्या पार करून जावे लागते. गावातील व
पंचक्रोशीतील नागरिकांचे जाणे, येणे सतत या रस्त्यावरून आहे. सर्व
गावातील नागरिक व पंचक्रोशीतील लोकांनी आज पर्यंत.
तालुक्यातील व गटातील जे पण लोकप्रतिनिधी निवडून आले. त्यांना
नेहमी हीच विनंती केली. की, आम्ही संपूर्ण शेतकरी आहोत, आमच्या
साठी काही नाही दिले, तरी चालेल पण आमच्यासाठी सुट्रेपाडा
गावाला लागून कुसुंबा रस्त्यावर या नद्या आहेत. या नदीवर पूल
बांधून द्या. आजपर्यंत गण, गट व ग्रामीणचे लोक प्रतिनिधींनी सुद्धा
या सर्व नागरिकांचे मजाक उडवला. त्यांच्यासमोर हाला हा मिळवून
निघून गेले. पण शासनापर्यंत या पुलाचा मुद्दा कधीच पोहोचवला
नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेत, तरी
सुद्धा या गावातील लोकांना तसेच पंचक्रोशीतील शेतकरींना स्वातंत्र्य
भेटला नाही. लोक प्रतिनिधींना ह्या सुट्रेपाडा व पंचक्रोशीतील
शेतकरी गरीब कष्टकरी मजूर यांची दया आलेली नाही. याचे आश्चर्य
वाटण्यासारखे आहे. आज पर्यंत सुट्रेपाडा गावातील व पंचक्रोशीतील
नागरिकांच्या शेतातला बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढी,वाहून गेले
एवढेच नाही. तर भरपूर जीवित हानी सुद्धा झाल्यात. 75 वर्षे पासून
ते आज पर्यंत गावातील सरपंच, गण, गट व ग्रामीणचे प्रतिनिधी हे
लोकांना खोटे आश्वासन देऊन निघून जातात. पण कधीच पुलाचा
प्रस्ताव शासनापर्यंत पाठवला नाही. जर या प्रतिनिधींनी प्रयत्न केला
असता. तर पुल सुद्धा झाला असता. म्हणून अभिलाल दादा देवरे
आणि गावातील व पंचक्रोशीतील नागरिक आम्ही नम्र विनंती करतो,
की आपण स्वतः या गावात येऊन चौकशी करून या नदी वरती पूल
मंजूर करावा. आणि गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर व बळीराजा यांना
न्याय द्यावा.
कारण शेतकऱ्यांचे शेतामध्ये मालचे गाड- बैल, गाडी, ट्रॅक्टर गुर-डोर
मुल- बाळ या रस्त्यावरून जातात. जर या नदी वरती दोन महिन्याच्या
आत पूल बांधला नाही. आणि कदाचित जीवित हानी झाली. तर
आम्ही सुट्रेपाडा व पंचक्रोशीतील नागरिक आणि धुळे जिल्हा सचिव अभिलाल दादा देवरे व वंचित बहुजन
आघाडीचे सर्व पदाधिकारी मिळून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या
गाडीची हवा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. आणि या
आंदोलनाचे जबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी असतील. याची
आपण नोंद घ्यावी. असा इशारा दिला
माहितीस्तव-
मा. संस्थापक अध्यक्ष ॲड. बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब आघाडी वंचित बहुजन
मा. खासदार डॉ. सुभाष भामरे साहेब धुळे लोकसभा
मा. आमदार कुणाल पाटील साहेब धुळे ग्रामीण विधानसभा
मा.कृषी सभापती संग्राम पाटील साहेब कुसुंबा जि.प.गट
मा. सभापती प्रा. विजय पाटील साहेब पं.स. कुसुंबा गण