भोकर, नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीने राबविलेला माजी सैनिक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी प्रतिपादन केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट रोजी भोकर येथील लक्ष्मणराव घिसेवाड महाविद्यालयात माजी सैनिक व दिव्यांगाचा सन्मान व ७५ विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे तर प्रमुख अतिथी म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे व काँग्रेसचे नेते तथा माजी सभापती नागनाथराव घिसेवाड उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकरच्या वतीने घेतलेले कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून पत्रकारांनी दिव्यांग बांधव आणि माजी सैनिकांचा सन्मान म्हणजे आजपर्यंतच्या सर्व कार्यक्रमापैकी उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे लोकनेते नागनाथ ईश्वर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पत्रकार अनिल डोईफोडे सरपंच गागदे, कन्हेवाड, गीतेस बोटलेवाड, सेनेचे संतोष आलेवार, विशाल बुद्धेवाड, पांडुरंग कटकमवार आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे व पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांच्या हस्ते माजी सैनिक बबन राऊत व देश सेवा करताना शहीद झालेले स्वर्गीय प्रफुल्ल गोवंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील गणपतराव गोवंदे, १२ दिव्यांग बांधवाचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ७५ विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यातही आले.
बहुजन तथा काँग्रेसचे नेते नागनाथ घिसेवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या या वाढदिवसा निमीत्त मान्यवरांच्या हस्ते प्रेस व संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघाचे सचिव सुभाष नाईक किनीकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, सचिव सुभाष नाईक, संघटक माधव गायकवाड यांनी प्रयत्न केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव उपस्थित होते.