कर्जत: जयेश जाधव
कर्जत : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा श्री एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या आदेशानुसार आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना पक्षाच्या शिंदे गट रायगड जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीमुळे भविष्यकाळात शिवसेना संघटना वाढीसाठी बळकटी मिळणार असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या रूपाने एक चांगल नेतृत्व रायगड जिल्ह्याला लाभणार आहे.त्यामुळे आमदार थोरवे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
या पुढील कालावधीत मी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून सक्रियपणे काम करणार असल्याची भावना आमदार महेंद्र थोरवे यांनी या निमीत्ताने व्यक्त केली आहे.