जोश्यांच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकून बंडोपंतानी घरात डोकवलं. जोशी दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” बंडोपंतानी त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”