शिंदखेडा प्रतिनिधि – महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा (अलाणे): शैक्षणिक उपक्रम, जि.प. शाळा अलाने येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेले आदिवासी व इतर समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शैक्षणिक साहित्य पेन व वह्या वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा,अलाणे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर आणि अलाणे गावातील प्रथम नागरिक माननीय सरपंच सौ. अरुणाबाई कोमलसिंग गिरासे यांच्यातर्फे मोफत साहित्य वाटप करण्यात आले.