पिंपळनेर, (प्रतिनिधी) पिंपळनेर येथील तेली मंगल कार्यालयात ता. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी तेलीक समाज व पिंपळनेर शहरा तर्फे आयोजित जेष्ठ नागरिकाचां सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट ही भेट वस्तू म्हणून देण्यात आली. तर सन 20021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप उपाध्यक्ष बबनराव चौधरी होते.दिप प्रज्वलन करून तेली समाजाचे आद्यदैवत श्रीसंत संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळनेर शहर तेलीक समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी केले. जेष्ठ नागरिकांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा ब्लॅंकेट देऊन करण्यात आला. या वेळी बोलताना मा.आमदार शिरीष चौधरी यांनी समाजातील विदयार्थी, उद्योजक व शेतकरी, यांना कुठलीही गरज पडली तर केव्हाही मदतीस तयार राहू असे आश्वासन दिले. आमदार मंजुळाताई गावित यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना त्यांच्या चेहऱ्यावरील शांत,प्रसन्न भाव व समाधानाचे भाव स्पष्ट करताना दिसत आहेत. संयोजकांनी मायेचा उबदार कोशरुपी ब्लॅंकेट भेट देऊन नव्या उमेदीने, सन्मानाने जगण्याची नवीन ऊर्जा दिल्याचे सांगितले. ताई पुढे म्हणाल्या” देणारा श्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो ,अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो, अथवा वृद्धांना जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट रुपी उपदार कोश असो. असे भावनिक मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या मुलींचेही कौतुक केले. विद्यार्थी गुण गौरव संदीप महाले व सतीश महाले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी गुणवंत विद्यात्यांचे कौतुक करताना पुढील शिक्षणात कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला नरेश रुपला चौधरी, बाळासाहेब आर.एन.शिंदे, प्रा.डॉ. अनिल चौधरी, सरपंच देविदास सोमा सोनवणे, संजय ठाकरे, नरेंद्र चौधरी, सुरेंद्रराव मराठे, जयवंत बागड, डॉ.राजेंद्र पगारे, सुभाष जैन, युसूफ शेट कासम, नितीन बाविस्कर, प्रमोद भावसार, प्रकाश अहिरराव,सुभाष जगताप, पंडित सूर्यवंशी व मुकेश ढोले हे सर्व समजातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तेली समाजाचे पिंपळनेर शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुभाष नेरकर, सचिव भरत बागुल, कार्याध्यक्ष देविदास नेरकर, कोषाध्यक्ष सुरेश बागुल, नेरकर, खजिनदार देविदास महाले, सह खजिनदार रामदास चौधरी व तेली समाज संचालक मंडळ चे सदस्य श्रीराम चौधरी, वसंतराव चौधरी, बाळकृष्ण चौधरी, हिरामण पवार, दिलीप धर्मा चौधरी, अनिल चौधरी, संजय चौधरी, संजय बागुल, संतोष चौधरी, किशोर चौधरी, जितेंद्र चौधरी, गणेश नेरकर, किशोर चौधरी, प्रमोद वाघ, अविनाश चौधरी, विनोद बोरसे, सल्लागार मंडळातील सदस्य दिलीप दौलत चौधरी, आनंदा चौधरी, यशवंत महाले, वनराज चौधरी, राजेंद्र वाघ व समस्त तेली समाज बांधव पिंपळनेर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन रत्नप्रभा बागुल, रुपाली चौधरी, तनुश्री बागुल यांनी केले. शेवटी आभार भरत बागुल यांनी मानले.