प्रतिनिधी :- महेंद्रसिंग गिरासे
आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या सूचनेनुसार झाली बैठक
1972 पासून तापी काठावरील गावांचे पूनर्वसन करण्याचे आदेश असतांना केवळ शासकिय अधिका-यांच्या दिरंगाईमुळे हा अदयापही प्रलंबित असून यावर तातडीने मार्ग काढून किमान ज्या गावांना जमिनी अधिग्रहीत झाल्या आहेत त्यांना प्लॉट वाटप करण्यात यावेत अशी आग्रही मागणी माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित केली यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी 16 सप्टेबर पर्यत किती गावांना प्लॉट वाटप करता येईल याबाबत अभ्यास करून दिवाळीपूर्वी प्लॉट वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकित दिल्या.
माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या सूचनेनुसार आज दि.2 रोजी जिल्हाध्किारी कार्यालयात तापी नदीच्या काठावरील जसाणे, हिसपूर, आच्छि, जुने कोडदे, नेवाडे, वरपाडे यासह 19 गावांचा पूनर्वसनाच्या स्थितीबाबत तसेच वाडी शेवाडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा-या वाडी आणि देवी गावाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी माजी मंत्री आ.जयकुमार रावल, अप्पर जिल्हाधिकारी गोंविदा दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाध्किाारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, उपअधिक्षक भूमि अभिलेख तहसिलदार सुनिल सैंदाणे, अपर तहसिलदार आशा गांगुर्डे, नगररचनाकार पवार, उपअभियंता ,खलाणे, पी.जी.पाटील कार्यकारी अभियंता, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, यांच्यासह माजी जि.प.सदस्य कामराज निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि.प.सदस्य पंकज कदम, विरेंद्र गिरासे, धनजंय मंगळे, देविदास पाटील, नाना दिवाणसिंग गिरासे, पं.स.सदस्य रणजित गिरासे, यांच्यासह जसाणे, हिसपूर, आच्छि, देवी वाडी, कुंभारे, कळगां येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्किाारी आणि आ.जयकुमारभाऊ रावल यांनी तापी काठावरील कोणत्या गावांना जमिनीचे संपादन होवून प्लॉट वाटप होण्याच्या स्थितीत आले आहेत आणि कोणती गांवे आहे त्याच ठिकाणी राहण्यास इच्छुक आहेत याची माहिती घेतली त्यानुसार जी गांवे पूनर्वसन होण्यास उत्सुक आहेत त्यांना दिवाळीपूर्वी प्लॉट वाटप करून त्यांचा पूनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्याबाबत अधिका-यांना अभ्यास करण्याबाबत सूचित करण्यात आले, यात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आ.रावल आणि जिल्हाधिकारी शर्मा यांनी दि.16 सप्टेंबर पर्यंत अधिका-यांना मुदत दिली असून त्या दिवशी याच विषयांवर पून्हा एकदाबैठक होवून पूढील रणनिती ठरविण्यात येणार आहे, यावेळी दिवी गावाचे पूनर्वसन मध्ये ज्या 17 प्रकारच्या नागरी सुविध पुरविण्यात येतात त्यात किती त्रुटी आहेत हे सबंधीत गावातील लोकांनी जिल्हाध्किारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिले तसेच वाडी गावात 7/12 अदयाप सबंधीत व्यक्तींच्या नावाने झालेले नाही हा विषय देखील सबंधीत ग्रामस्थांनी उपस्थित केला.
पूनर्वसनाठी वर्किग ग्रुप स्थापन करा – आ.जयकुमारभाऊ रावल यांची भूमिका
तापी नदीच्या काठावरील गावांचा पूनर्वसनाचा प्रश्न सन 1972 पासून प्रलंबित असून अनेक अधिकारी बदलतात पंरतू या विषयावर कुणीही रस घेवून काम करीत नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे, त्यामुळे यासाठी उपजिल्हाधिकारी पूनर्वसन, उपविभागीय अधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी, सबंधीत तहसिलदार, भूसंपादन अधिकारी यासह सबंधीत प्रमुख अधिका-यांची एक वर्किंग कमिटी स्थापन करून त्यांच्या दर 8 दिवसात बैठका होतील त्यावर कार्यवाही होईल असे नियोजन करण्याबाबत माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांनी सुचना केली त्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबतचे आदेश तातडीने पारीत करून तशी समिती स्थापन करण्याचे आ.रावल यांना आश्वासित केले.