वर्शी ता.शिंदखेडा येथील माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक श्री यशवंत निकवाडे यांना नुकतेच 5 सप्टेंबर ह्या सर्व पल्ली राधाकृष्ण जयंती या शिक्षक दिनानिमित्त निसर्ग मित्र समितीचा ,धुळे चा वतीने देण्यात आला. हा मानाच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी निवड समितीने एकमताने निवड केली . श्री.यशवंत निकवाडे यांनी आतापर्यंत केलेले शैक्षणिक श्रेत्रातील उत्तम कामगिरी,अनेक वर्षांपासून करत आलेले विधायक कामाची दखल घेत संस्थेने त्यांची निवड केली. आतापर्यंत यशवंत निकवाडे यांचे शैक्षणिक श्रेत्रातील काम, सामाजिक श्रेत्रातील काम खूप उत्तम आहे.त्यांनी आतापर्यंत चार पुस्तके लिहलेली आहेत, त्यांचे अनेक ठिकाणी व्याख्यानेपण झालेली आहेत.त्यांचे समाज प्रबोधनपर लेख ,कविता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक जनजागृतीपर स्केचेस काढलेले आहेत. त्यांचे सुत्र संचालन ऐकणे श्रोत्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या जयंतीनिमित्त प्रधान करण्यात आला आहे.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.हा पुरस्कार मिळाल्याने अजून एक पुरस्काराची भर पडेलेली आहे. त्यांना हा पुरस्कार मा. श्री.डी.बी. पाटिल, मा.श्री.संतोष पाटील, मा.श्री.शरदराव सुर्यवंशी, मा.श्री.देशमुख, मा. श्री.पाटील व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक दिनानिमित्त प्रधान करण्यात आला.