पिंपळनेर प्रतिनिधी – अनिल बोराडे
Dpt news network Dhule : पिंपळनेर येथील एकलव्य इंग्लिश मीडियम निवासी विद्यालयातून इयत्ता आठवीचा विद्यार्थी तीन दिवसांपासून कुणालाही काही न सांगता बेपत्ता होता. तो आज शाळेच्या मागील बाजुस असलेल्या पांझरा नदीच्या पात्रात मृत अवस्थेत आढळून आला.
त्याचा घातपात झाल्याची शंका नातेवाईकांनी व्यक्त केली असुन व्यवस्थापक व वाचमनला निलंबित करा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी घोडमिसे या स्वतः घटना स्थळी येत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. आदिवासी विभागाचे शिक्षणाधिकारी दाखल झाले असून पिंपळनेर पोलिसात प्राचार्य पी. डी. साळवे यांनी खबर दिली.
यावेळी आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव डोंगरभाऊ बागुल, महाराष्ट्र आदिवासी बचाव समितीचे गणेश गावित, प्रेमचंद सोनवणे एकलव्य संघटनेचे सुरेश माळचे यांनीही प्रकल्पाधिकारी जोपर्यंत घटनास्थळावर येत नाही व दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला.
पिंपळनेर येथील एकलव्य इंग्लिश मीडियम निवासी विद्यालयात टेंभे पैकी दळुबाई गावठाण येथे राहणारा दिनेश जजिराम बोरसे यांचा तेरा वर्षे मुलगा निलेश दिनेश बोरसे हा इयत्ता आठवीत निवासी शिक्षण घेत होता. तो दि. 1 सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत हॉस्टेलवर होता. मात्र दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी वर्ग भरल्यावर वर्गशिक्षक धनंजय संधानसी यांनी हजेरी घेतली असता निलेश आढळून आला नाही. त्यांनी चौकशी केली असता रात्री जेवणासोबत झोपेपर्यंत निलेश हा होस्टेलवर असल्याचे विद्यार्थी व वाचमनने सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी प्राचार्य साळवे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी निलेशच्या आई वडिलांना फोन केला असता तो घरी आलेला नाही. असे सांगितले. पिंपळनेर पोलिसात घटनेची खबर प्राचार्य साळवे यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी निलेश वडिलांचे फोनवर बोलला होता आता माझी तब्येत ही व्यवस्थित असल्याचे सांगितले होते.
पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप सोनवणे, भाईदास मालचे यांनी विद्यालयात पोलिसांसह विद्यार्थ्यांशी व कर्मचार्यांशी संवाद साधला कोणीला माहिती नव्हती मग सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास निलेश त्याच्या चार मित्रासोबत होस्टल वरून उतरून दुसर्या मजल्याच्या पाठीमागील जिन्याने उतरला.
मात्र त्याचे साथीदार परत आल्याचे कॅमेर्यात कैद झाले आहे.त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.होस्टलच्या मागील बाजूस पांझरा नदीत उतरण्यासाठी सोय आहे. त्यांचे परत आलेले जोडीदार अद्यापही माहिती देत नसल्याने घटनेचे गुढ वाढले आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी आदिवासी विभागाचे शिक्षणाधिकारी पी. एल. ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. काकड, गणेश गावित, तानाजी बहिरम एकलव्य संघटनेचे सुरेश माळचे यांनी विद्यालयात येऊन चौकशी केली तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय भाईदास मालचे,प्रदीप सोनवणे यांनीही पंचनामा केला.
निलेशचे वडील दिनेश जेजिराम बोरसे व आई सौ. संगीता बोरसे यांना अश्रू आणावर झाल्याने अश्रुंना वाट मोकळी करत माझ्या मुलाचा तपास लवकर करा अशी मागणी केली होती. त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक व त्यांचे नातेवाईक विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाले मात्र आज सकाळी शाळेच्या पाठीमागील पांझरा नदीवर मुलाचे मृतदेह काही लोकांना दिसले त्यानंतर त्यांनी बाबा फ्रेंड ग्रुपचे सदस्य पप्पू पवार, राकेश पवार, मुशाहिद शेख, किरण वाघ ,व अक्षय अहिरे यांनी पोलीस स्टेशनला कळवून त्यांनी पोलिसांसह निलेश बोरसेचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होते. बाबा फ्रेन्ड ग्रुपचेहे तरूण हे जिवाची पर्वा न करता मृतदेह काढण्यास मदत करत असतात.त्यांनी व पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर नातेवाईकांनी ओळख पटवली व निलेश असल्याचे सांगितले.