नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

श्री गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा : 36 हजार 550 रुपये किमतीचा 1120 किलो भेसळयुक्त गुलाल जप्त




प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: श्री गणेश विसर्जन काळात नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणारा 36 हजार 550 रुपये किमतीचा 1120 किलो भेसळयुक्त गुलाल जप्त करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि.31 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे यावर्षा पासून गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना विसर्जन मिरवणूकीचे वेळी मुख्य मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे . त्यासाठी विविध निकषांचा विचार करण्यात येणार आहे . त्यात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे याचा देखील समावेश आहे . सण उत्सवात भेसळ युक्त गुलाल व रंग याचा अतिरेकी वापर यामुळे तक्रारी प्राप्त होत आहेत . त्याअनुषंगाने अशा प्रकारच्या कारवाया करण्याचे आदेश,
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी दिले होते . दि. 05 सप्टेंबर रोजी,
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम अॅपे रिक्षा मध्ये भेसळ युक्त गुलालाच्या गोण्या भरून नंदुरबार शहरात विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदर बातमी बाबत सविस्तर माहिती घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन भेसळयुक्त गुलालाच्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले .
मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने दि. 05 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील हाट दरवाजा पोलीस चौकी जवळ सापळा रचला . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाहनांची तपासणी करीत असतांना नंदुरबार शहरातील गांधी पुतळ्याकडून हाट दरवाजाकडे येणारे एक ॲपे रिक्षा वाहन येतांना दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अमंलदारांनी हाताच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून सदर अॅपे रिक्षा वाहन थांबविले . रिक्षा चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदारांनी आपली ओळख देवून चालकास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव इकबाल दाऊद कुरेशी ( वय -28) रा . गाझी नगर नंदुरबार असे सांगितले वाहन चालकास वाहनात काय आहे ? बाबत विचारपुस करता त्याने उड़वा उडवीची उत्तरे दिली म्हणून पथकाने दोन पंचासमक्ष वाहनाच्या मागील बाजूस पाहणी केली असता त्यात गुलालाच्या गोण्या भरलेल्या मिळून आल्या ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे अॅपे रिक्षामध्ये मिळून आलेल्या गुलालाच्या गोण्या कोठून व कोठे घेवून जात आहे ? या बाबत विचारपूस केली असता त्याने काही एक समाधान कारक उत्तरे दिली नाही . तसेच गुलाल विकत घेतले बाबत सदर इसमा कडे बिल पावती मागितली असता त्याच्याकडे कोणतीही बिल पावती नसल्याचे त्याने सांगितले . सदर अॅपे रिक्षा मध्ये 11,500 रुपये किमतीच्या 60 भेसळ युक्त गुलालाच्या गोण्या तसेच 25 हजार रुपये किमतीची एक अॅपे रिक्षा असा एकूण 36 हजार 500 / – रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे व त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे ची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे .
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक , नंदुरबार विजय पवार ,उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस हवालदार राकेश वसावे , जितेंद्र तांबोळी , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस शिपाई अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे .

नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , गुलालाचा वापर केल्यामुळे मानवी त्वचेवर व शरीरावर दुष्परिणाम होतात . तसेच गुलालमुळे वायु प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणावर होते . गुलालात विषारी रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे कर्करोग , फुफ्फसाचे विविध आजार होण्याची शक्यता असते . गुलाल डोळ्यात गेल्यास डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते .
गुलालामुळे विविध प्रकारचे रक्तांचे आजार देखील होऊ शकतात . त्यामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा . भेसळयुक्त गुलाला बाबत काही एक माहिती मिळाल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , नंदुरबार 02564-210100 – 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

पी . आर . पाटील
पोलीस अधीक्षक , नंदुरबार

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:51 pm, January 14, 2025
temperature icon 30°C
साफ आकाश
Humidity 31 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!