नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेतकऱ्यांची भारनियमाला व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या..

प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण



नंदुरबार -: नंदुरबार तालुक्यातील आसाने येथील शेतकरी समाधान हिरामण पाटील ( वय ३८ ) यांनी सततची नापिकी , रोजचे विजेचे भारनियमन , बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वपट्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाले नाही . विहिरींना जेमतेम पाणी आहे . अशातच विजेचे रोज रात्रीचे भारनियमन गेल्या २ महिन्यापासून अक्राळे सबस्टेशन अंतर्गत आठ दिवसाआड पूर्ण रात्रीचे भारनियमन चालू आहे .
रात्री १२.३० ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत भारनियमन चालु आहे . दरम्यान नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील येथील शेतकरी समाधान हिरामण पाटील ( वय ३८ ) यांच्या शेतातील पिके ही कोमजू लागली .
अशातच वारंवार लाईट ये जा करत असल्याने विद्युत पंप दोन वेळा नादुरुस्त झाला . आई वडील गेल्या नंतर ३ बहिणींचे लग्न याच भावाने केले . त्यामुळे डोक्यावर युनियन बँक ऑफ इंडियाचे बँकेचे कर्ज झाले . कर्ज फेडू शकला नाही . सततची नापिकी , भारनियमनामुळे रोजचे जागरण , वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आदी कारणामुळे नैराश्य आल्याने समाधान पाटील यांनी आज दि . ५ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेतला .
सदर शेतकऱ्याच्या पश्चात्य ३ बहिणी पत्नी १२ वर्षांचा एक मुलगा , व १४ वर्षाची एक मुलगी आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:46 pm, January 13, 2025
temperature icon 21°C
साफ आकाश
Humidity 45 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!