प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण
अक्कलकुवा: दिनांक 07 सप्टेंबर 2022 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल खेतेश्र्वर जवळ, अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग, खापर नाजिक वाहन क्रमांक MH 40 एन 2727 (टाटा कंपनीचे वाहन) ची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू – बब्बू गोल्ड व गोल्डन युग एकूण साठा – 09750 पॅकेट्स एकूण किंमत रू 12,11,000/- व वाहन किंमत रु 13,00,000 जप्त करण्यात आले. असा एकूण 25,11,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी राजकुमार रामकरण यादव वय 42 वर्ष रा. वाडी, नागपूर यांस अटक केली आहे.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार यांनी फिर्याद दिली असून अक्कलकुवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत, पो.ना. कपिल बोरसे, पो.ना. देविदास विसपुते, पो. ना. किशोर वळवी, पो.ना. खुशाल माळी, पो. ना. अजय पवार, पो. शि. आदिनाथ गोसावी , पो.शि. गिरीश सांगळे व अन्न व औषध प्रशासन नंदुरबार चे सहायक आयुक्त सं. कृ. कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार , लिपिक समाधान बारी यांनी केली आहे.