प्रतिनीधी – सुनील कांबळे
DPT NEWS Network मुंबई: एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे घेऊन कॅश व्हॅनचा चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना गोरेगावमध्ये घडली होती. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. एटीएम मशिनमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या या कॅश व्हॅनमध्ये 2 कोटी 80 लाख रूपये होते. चालक व्हॅनसह हे पैसे घेऊन फरार झाला होता. वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन निघाली होती. संधी मिळताच चालक ही व्हॅन घेऊन फरार झाला होता.
ज्यावेळी चालक त्या व्हॅनसह पळून गेला त्यावेळी त्या व्हॅनमध्ये एकूण 2 कोटी 80 लाख रुपये होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर गोरेगाव पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. कॅश व्हॅन वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅश घेऊन आली होती.
सोमवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान तो कंपनीतील त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन निघाला. गोरेगाव पश्चिमेकडे असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कॅश व्हॅन बँकेजवळ थांबल्यावर उदयभानचे सहकारी रोकड भरण्यासाठी खाली उतरले. ते काम आटपून परतले, तेव्हा उदयभान तिथे नव्हता. उदयभान व्हॅन घेऊन तिथून गेला होता. त्यांनी उदयभानला वारंवार फोन केले. मात्र त्यानं प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी जीपीएसच्या माध्यमातून उदयभानचं लोकेशन शोधलं.
पोलिसांनी कॅश व्हॅनमध्ये बसवलेल्या जीपीएसच्या मदतीने वाहनाचे लोकेशन ट्रेस केले असता कॅश व्हॅन गोरेगावच्या पिरामल नगरमध्ये उभी असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले. त्यावेळी तिथं वाहन मिळून आलं मात्र चालक तिथं नव्हता, तसेच पैसे देखील गायब होते. यानंतर पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी चालक उदयभान सिंह (वय 34) याला पालघर येथून अटक केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून कॅश मॅनेजमेंट एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता.