प्रतिनिधी-महेंद्रसिंग गिरासे.
दोंडाईचा-मोटरसायकलने घरी जात असताना भरधाव ट्रकने धडक देत सरपंचाला चिरडल्याची घटना आज दिनांक 21 रोजी सायंकाळी 5.30 मिनिटात घडले घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकला पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून चालक फरार झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा जवळील प्राणी येथील लोकनियुक्त सरपंच कडूजी रेवजी ठाकरे वय 72 हे आज सायंकाळी दोंडाईचा येथून बाजार करून घरी येत असताना दोंडाईचा रामी रस्त्यादरम्यान महादेव मंदिराजवळ दोंडाईचा कडून नंदुरबार च्या दिशेने जाणाऱ्या एम.एच १८बीजे ६५५४ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली त्यात कडूजी ठाकरे खाली कोसळल्याने त्यांना डोक्याला जबर मार लागला ट्रक चालकाने सरपंच यांना चिरडून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत धावडे गावाच्या पुढे नयन हॉटेल जवळ डंपरला अडवले मात्र ट्रक चालक फरार झाला असून दोंडाईचा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.