पिंपळनेर (प्रतिनिधी) अनिल बोराडे
धुळे: नियोजित पिंपळनेर तालुका जु.कॉ.संघटना पिंपळनेर तर्फे अप्पर तहसीलदार अनिल उचाळे पिंपळनेर यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयापासून बाईक रॅलीचे आयोजन करून, रॅली सामोडे चौफुली, बस स्टँड ,मेन बाजार गल्ली,गांधी चौक येथून थेट अप्पर तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी पिंपळनेर ता.ज्यु.कॉ.संघटनेचे सर्व पदाधिकारी व एक नोव्हेंबर 2005 पासून सेवेत असलेल्या सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू हवी यासाठी अप्पर तहसीलदार अनिल उचाळे साहेब यांना निवेदन दिले. यावेळी नियोजित पिंपळनेर ता.जुनि.कॉलेज संघटनेचे अध्यक्ष प्रा.एस.पी.शिंदे उपाध्यक्ष प्रा.ए.बी पाटील, सचिव प्रा.पंडित गोयकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.जी.एस. सूर्यवंशी,प्रा.एस.जे.शिंपी,प्रा.ए.बी.महाले,प्रा.अमोल देवरे,प्रा.डी.एन.बरडे,प्रा.आय.ए.पठाण,प्रा.एन.पी.मानकर,प्रा.बी.एच.बागुल,प्रा.एस.ए.भदाणे,प्रा.एस.एम.पवार,प्रा.महेश नंदन,प्रा.खतगावेआदि मान्यवर उपस्थित होते. निवेदन देताना सा.ता. जुनि.कॉलेज संघटनेचे मा. अध्यक्ष ज्येष्ठ प्रा. एस.डी. पाटील यांनी आज जागतिक अल्झायमर दिनानिमित्त शासनाची विस्मृतित गेलेल्या शासनाची स्मृति जागी व्हावी म्हणून आणि आमच्या न्याय हक्काची 17 वर्षाची मागणी शासनाने पूर्ण करावी यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.मा.तहसीलदारांनी आमचे हे निवेदन शासनापर्यंत पोहोचवावे अशी विनंती केली. काही राज्यांमध्ये ही योजना लागू आहे. राजकीय लोकप्रतिनिधी,लोकसभा,विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा यांना ही योजना लागू आहे. मग ३०-३५ वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ही योजना पूर्वीप्रमाणे का लागू करण्यात येत नाही.आमची रास्त मागणी शासनाने मान्य केली नाही तर यापुढे रस्त्यावर, जेलभर आंदोलन केले जाईल.असा इशारा दिला.यावेळी तहसीलदार अनिल उचाळे साहेब यांनी आपली मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. रॅलीचा समारोप करतांना आभार पिंपळनेर जुनि.कॉ.संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.