प्रतिनिधी अनिल बोराडे
धुळे: मोहगाव ता.साक्री येथील गृप ग्रामपंचायतीत वडपाडा व चावडीपाडा हे गाव होती. या ग्रामपंचायतीची सध्या विभागणी झाली असुन मोहगाव व चावडीपाडा या दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या परंतु वडपाडा गावाला विश्वासात न घेता परस्पर ठराव करून, ग्रामपंचायत वेगळी झाली. परंतु याच पंचायतीतील वडपाडा गावावर अन्याय झाल्याचे येथील ग्रामस्थ व माजी सरपंच उत्तम देशमुख, गुलाब बहिरम व शांताराम चौधरी यांनी म्हटले आहे की आमचे वडपाडा हे अर्धे चावडीपाडा तर अर्धे गाव मोहगाव महसुलाच्या नकाशात दाखवित आहे.
आम्ही वडपाडा वाहिसीयांनी न्याय कुणा कडे मागायचा, आम्ही न्याय मागण्यासाठी महसुलचे उपजिल्हाधिकारी धुळे यांच्या कडे गेलो असता त्यांनी ग्रामपंचायत चा ठराव आना मी तुम्हाला तुमच्या पध्दतीने मोहगाव किंवा चावडीपाडा या ग्रामपंचायतीत समायोजन करून देतो. त्या आशयाने आज दि. 22 रोजी मोहगाव येथे ग्रामसभा होती. त्या सभेत पंचायत समिती सदस्य रमेश गांगुर्डे, गटविकास अधिकारी जे.पी.सुर्यवशी, प्रशासक अमृत पंडीत महाले, ग्रामसेवक धनलाला महाले, सर्कल, तलाठी हे उपस्थित होते परंतु चावडीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित नव्हते, तसेच मोहगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी सांगितले की तुम्ही महसुल मध्ये ज्या पंचायतीकडे दिसत आहे तिकडे जोडले जा तर वडपाडा वाले ग्रामस्थ म्हणतात की आम्ही आमच्या गावाचे दोन तुकडे का करू असा वाद निर्माण झाला आहे.
आम्ही वडपाडा वासियांनी न्याय कुणाकडे मागायचा म्हणून आज मोहगाव ता.साक्री येथील ग्रामसभेत शासनाचे आधिकारी आले असतांना वडपाडा येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कडे ग्रामसभेच्या ठरावा बाबतव्यथा मांडली परंतु एका गावाचे ग्रामस्थच उपस्थित नव्हते ठरावं मिळाला नाही म्हणून आता आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयात जाणार आहोत. असे माजी सरपंच उत्तम देशमुख, गुलाब बहिरम, शांताराम चौधरी.