प्रतिनिधी अनिल बोराडे
पिंपळनेर– राज्य महिला सहभाग व सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ अभियानाअंतर्गत ‘नवरंगी संवाद’2022 अंतर्गत अंधश्रध्दा निर्मुलन समिती पिंपळनेर यांनी चार दिवस व्याख्यान मालेचे आयोजन केले असून दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा मंगल कार्यालय पिंपळनेर येथे पाहिले पुष्प अनिस जिल्हा प्रधान सचिव श्रीमती डॉ.प्रतिभा देशमुख(चौरे) यांनी काळ विधवा प्रथा बंदीचा या विषयावर स्वानुभवाने कथन व सामाजिक परिपेक्षात विधवा स्त्रीयांना भोगाव्या लागणाऱ्या यातना आपल्या व्याख्यानातून कथन करत असताना श्रोत्याचे डोळे भरून आले आणि म्हणून आज एकविसाव्या शतकात परिवर्तन वादी विचारांची कास धरून स्रियांना अश्या जोखडातून मुक्त केले पाहिजे यासाठी चळवळ उभी व्हावी असे सांगितले.कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी प्रा श्रीमती एम डी माळी मॅडम होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विधवा महिलांच्या कुटुंबाची परवड कशी होते हे याचे प्रत्येक्ष घडलेले उदाहरण देऊन समाजाने परिवर्तनाचा दिशेने विचार करावा असे सांगितले.कार्यक्रमचे प्रास्तविक प्रा डॉ सुरेश अहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा शिवप्रसाद शेवाळे यांनी केले.यावेळी श्रीमती रेखा पाटील व मनीषा भदाणे यांनी जिजाऊ वंदना गायिली त्यानंतर अनिस साथींना 2022 मध्ये विविध पुरस्कार मिळाले त्यांचा सन्मान अनिस तर्फे करण्यात आला त्यात पिंपळनेर रत्न पुरस्कार प्राप्त दादासाहेब सुरेंद्र मराठे, बाळशास्त्री जांभेकर आदर्श गुरुजन पुरस्कार प्राप्त श्रीमती प्रा श्रीमती एम डी माळी, रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे तर्फे राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार प्राप्त प्रा प्रदीप सावळे ,आदर्श गुरुजन पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख शिरीष कुवर,प्राचार्य डॉ एस टी सोनवणे,श्रीमती सुषमा भामरे अहिरे,ललिता जाधव बिरारीस,श्रीमती रेखा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अनिस चे अध्यक्ष सुरेंद्र मराठे,ए बी मराठे, व्ही एन जिरे पाटील,देविदास नेरकर, अनिस जिल्हा कार्यवाह सुभाष जगताप,डी डी महाले,रिकब जैन,पत्रकार विशाल गांगुर्डे,प्रा पी एच जाधव,शांताराम बिरारीस,अनिल अहिरे,प्रा.चंद्रकांत घरटे,व महिला भगिनी उपस्थित होत्या.आभार मनीषा भदाणे यांनी मानले.