प्रतिनिधी – तोहिद मुल्ला
सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४० रा. ) याचा नियोजित विमानतळाच्या खुल्या जागेत धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर वार करत खून करण्यात आला. विठ्ठल जाधव हा सेंट्रिंग कामगार म्हणून काम करीत होता. खूनाची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घटना घडली असल्याचा पोलिसांचा कयास होता.या प्रकरणी पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी सांगली ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सुचना केल्या होत्या.त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.त्यांच प्रमाणे सर्व पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचा तपास चालू केला.सा़गली ग्रामीण हद्दीमधील बुधगाव,कवलापूर, कुपवाड यांच्यामधील गोपीनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली असता सदरचा गुन्हा हा अजय पवार,दौलत पवार दोघेही राहणार गोसावी गल्ली बुधगाव ता.मिरज जि.सांगली यांनी केला आहे.सदरचे संशयित इसम हे विश्रामबाग १०० फुटी रोड डी मार्ट जवळ येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर पथकाने दोघांना डी मार्ट जवळ चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना नावे विचारली असता अजय संजय पवार वय वर्षे २३ राहणार गोसावी गल्ली बुधगाव व दौलत सर्जेराव पवार वय वर्षे ३७ राहणार गोसावी गल्ली बुधगाव असे सांगितले.त्यांच्याकडे सांगली ग्रामीण हद्दीतील विमानतळ येथे झालेल्या विठ्ठल जाधव यांच्या खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता ते दोघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.त्यावेळी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार विश्वासात घेऊन कौशल्य पुर्ण तपास केला.दौलत पवार यांनी सांगितले की विठ्ठल जाधव हे दोघे फरशी फिटिंगचे काम करत होते.त्यामुळे विठ्ठल जाधव यांचे दौलत पवार यांच्या घरी येणे जाणे होते.त्यावेळी विठ्ठल जाधव हा दौलत पवार यांच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांचा राग मनात धरून खुन केल्याचे कबुल केले.